‘जवान’नंतर अॅटलीच्या ‘बेबी जॉन’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित
04-Nov-2024
Total Views | 44
मुंबई: शाहरुख खानची प्रमुख भूमिका असणारा जवान चित्रपट गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करणारा चित्रपट ठरला. या चित्रपटाच्या निमित्ताने दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर आता निर्माता म्हणून अॅटलीचा ‘बेबी जॉन’ चित्रपट लवकरच भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
‘बेबी जॉन’ या चित्रपटात अभिनेता वरुण धवन प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये अॅक्शन, भावनिक सीन्स पाहायला मिळत आहेत. या टीझरवरून वरुण धवन दुहेरी भूमिकेत झळकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘बेबी जॉन’ चित्रपटात वरुण धवनबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री कीरथि सुरेश आणि वामिका गब्बी दिसणार आहेत.
महत्त्वाचं म्हणजे ‘बेबी जॉन’ चित्रपटाच्या टीझरमधील अभिनेते जॅकी श्रॉफच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या चित्रपटात ते खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘बेबी जॉन’ चित्रपटाच दिग्दर्शन कलीस यांनी केलं असून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याचं म्हटलं जात आहे.
ख्रिसमसच्या मुहूर्तावर २५ डिसेंबर २०२४ रोजी ‘बेबी जॉन’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दरम्यान, ‘बेबी जॉन’ हा तमिळ चित्रपटाचा रिमेक असून अॅटलीनेच दिग्दर्शित केलेल्या ‘थेरी’ चित्रपटाचा ‘बेबी जॉन’ रीमेक आहे. त्या तमिळ चित्रपटात थलपति विजय, समांथा रुथ प्रभु आणि एमी जॅक्सन झळकले होते.