अवघ्या महाराष्ट्राबरोबरच नाशिकच्या रामभूमीनेही आपला कौल महायुतीच्या पारड्यात टाकत जिल्ह्यातील १४ जागांवर महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला. आमदारांनी जिल्ह्यात केलेल्या विकासकामांच्या जोडीला रा. स्व. संघाचे सूक्ष्म नियोजन आणि ‘लाडकी बहीण योजने’चा महायुतीला मोठ्या प्रमाणावर फायदा झाल्याचे निवडणूक निकालांवरून स्पष्ट झाले आहे.

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाने हुरळून गेलेल्या महाविकास आघाडीचा भ्रमाचा भोपळा नाशिकच्या जनतेने फोडला. ‘परिवर्तनाची भूमी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिकनगरीने मोठे उलटफेर करत महायुतीच्या पारड्यात अभूतपूर्व यश टाकले आहे. नाशिकमध्येदेखील महायुतीचा सुपडा साफ करू, अशा वल्गना करण्यात वेळ खर्ची घातला. याउलट महायुतीचे देशातील आणि राज्यातील नेते तळागाळात पोहोचत सुरू केलेल्या योजनांची माहिती पोहोचवत आपला प्रचार केला. त्याचबरोबर भाजपने सुरू केलेल्या ‘उत्तर महाराष्ट्र मीडिया सेंटर’नेदेखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या खोट्या आरोपांना नेत्यांच्या माध्यमातून उत्तर देण्याचे काम केले. महायुती सरकारने केलेल्या योजना सर्वसामान्य जनतेला भावल्याने नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर यश मिळाल्याचे समोर आलेल्या निकालांवरून स्पष्ट व्हावे.
अपेक्षेप्रमाणे जिल्ह्यातील पहिला विजय निफाडचा लागला. येथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दिलीप बनकर यांनी उबाठा गटाच्या अनिल कदम यांना पराभवाची धूळ चारली. गेल्या अनेक वर्षांपासून नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या गेटचा प्रश्न प्रलंबित होता. हा प्रश्न दिलीप बनकर यांनी सत्तेत आल्यानंतर मार्गी लावला. त्यामुळे निफाडकरांनी दुसर्यांदा दिलीप बनकर यांना निवडून दिले आहे. देवळालीमधूनही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सरोज अहिरे यांनी दुसर्यांदा विजय मिळवला आहे. तिरंगी लढतीत अहिरे यांनी शिवसेनेच्या राजश्री अहिरराव आणि उबाठा गटाचे योगेश घोलप यांचा पराभव केला. सरोज अहिरे यांनी भगुरकरांना खराब रस्त्याच्या त्रासातून मुक्त केले. त्याची परतफेड करताना देवळालीच्या मतदारांनी ‘विकासकन्या’ सरोज अहिरे यांना दुसर्यांदा आमदारकी बहाल केली आहे. त्याचप्रमाणे, विधानसभेचा उपाध्यक्ष पुन्हा आमदार होत नाही. त्याचे राजकीय जीवन संपुष्टात येते, असा आजपर्यंतचा इतिहास राहिला आहे. मात्र, नरहरी झिरवाळ यांनी दिंडोरीत मोठा विजय मिळवत विधानसभेचा उपाध्यक्ष पराभूत होण्याची मालिका खंडित करण्याचा पराक्रमही केला. दिंडोरीचे सर्वच नेते झिरवाळ यांच्या विरोधात असतानाही ४० हजारांपेक्षा अधिक मतांनी त्यांनी विजय मिळवला आहे. दिलीप बोरसे यांनी दुसर्यांदा बागलाणमधून विजय मिळवला आहे. दिलीप बोरसे यांच्या झंझावातापुढे संपूर्ण बागलाणमधील शरद पवार गटाबरोबरच महाविकास आघाडी पालापाचोळ्यासारखी उडून गेल्याचे दिसून आले.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनीही आपला विजय साजरा केला आहे. सुरुवातीला पिछाडीवर असलेले भुजबळ सरतेशेवटी २६ हजार, ४०० मतांच्या आघाडीने निवडून आले. शरद पवार गटाच्या माणिकराव शिंदे यांचा छगन भुजबळ यांनी पराभव केला. विशेष म्हणजे, भुजबळ यांनी येवल्यातून लढावे, यासाठी माणिकराव शिंदेंनीच २० वर्षांपूर्वी पुढाकार घेतला होता. कायम दुष्काळ असलेल्या येवला मतदारसंघात १२ महिने शेतीसाठी पाणी भुजबळ यांनी उपलब्ध करून दिले. त्यामुळे मनोज जरांगे-पाटील यांनी येवल्यात सभा घेऊनही त्याचा कोणताही परिणाम येवल्याच्या मतदारांवर न झाल्याचे भुजबळ यांच्या विजयावरून लक्षात येते.
चांदवड-देवळ्यामधून भाजपचे डॉ. राहुल आहेर यांनी विजय मिळवत मंत्रिपदाला गवसणी घातली आहे. प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी राहुल आहेर यांना २० हजारांच्या आघाडीने निवडून दिले, तर कॅबिनेट मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते. आहेर यांच्या विजयाने चांदवडचे मंत्रिपद दृष्टिक्षेपात आले आहे. त्याचप्रमाणे नाशिक शहरातील मतदारांनी सलग तिसर्यांदा भारतीय जनता पक्षाला साथ दिली आहे. नाशिक पश्चिममधून सीमा हिरे, तर नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे यांनी विजयाची हॅट्ट्रिक साजरी केली आहे, तर नाशिक पूर्वमधून राहुल ढिकले यांनी दुसर्यांदा, तर भाजपने तिसर्यांदा विजय साजरा केला आहे. २००९ सालच्या निवडणुकीत नाशिक पूर्वमधून बाळासाहेब सानप विजयी झाले होते. निवडणूक सुरू होण्याच्या आधीपासूनच नाशिक पूर्वमध्ये भाजपचे राहुल ढिकले यांचा विजय निश्चित मानला जात होता. कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पवार यांनी माकपचे जिवा पांडू गावित यांचा पराभव केला, तर मालेगाव बाह्य मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचे दादा भुसे यांनी सलग चौथ्यांदा विजय संपादन करण्याचा पराक्रम केला आहे. उबाठा गटाचे उमेदवार अद्वय हिरे तिसर्या क्रमांकावर राहिले, तर मालेगावला लागून असलेल्या नांदगाव मतदारसंघातून शिदेंच्या शिवसेनेचे सुहास कांदे यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर विजयाला गवसणी घातली. नांदगावमध्ये तर उबाठा गटाचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. इगतपुरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे हिरामण खोसकर यांनी काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावत विजय मिळवला.
काँग्रेसमधून उमेदवारीची निश्चिती नसल्याने खोसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गटात पक्षात प्रवेश करत विजय मिळवला, तर मालेगाव मध्यतून ‘एमआयएम’चे मुफ्ती मोहम्मद इस्माईल विजयी झाले. त्यांनी अपक्ष आसिफ शेख रशीद यांचा पराभव केला, तर सिन्नरमधून माणिकराव कोकाटे यांनी उबाठा गटाच्या उदय सांगळे यांना धूळ चारली. एकूणच, केलेल्या विकासकामांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जाणार्या महायुतीला लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केल्याने ‘एमआयएम’ वगळता, सर्व १४ जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे.

पक्ष जिंकलेल्या जागा
भाजप ०५
शिवसेना (शिंदे) ०२
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ०७
अन्य ०१
विराम गांगुर्डे