ब्राझीलच्या अॅमेझॉनमध्ये विमान अपघात,१४ जणांचा मृत्यू

    18-Sep-2023
Total Views |
Plane Crash In Brazil

नवी दिल्ली : ब्राझीलच्या उत्तरेकडील अॅमेझॉन राज्यात दि.१६ सप्टेंबर रोजी विमान अपघात झाला. या विमान अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला. वृत्तसंस्था रॉयटर्सने स्थानिक महापौरांच्या हवाल्याने सांगितले की, राज्याची राजधानी मानौसपासून सुमारे ४०० किमी अंतरावर असलेल्या बार्सेलोस प्रांतात हा अपघात झाला.

अॅमेझॉनचे गव्हर्नर विल्सन लिमा यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. "बार्सिलोना येथे दि. १६ सप्टेंबर रोजी झालेल्या विमान अपघातात १२ प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्सचा मृत्यू झाल्याबद्दल मला मनापासून खेद वाटतो," असे गव्हर्नर यांनी म्हणटले आहे.

अॅमेझॉनचे गव्हर्नर म्हणाले की, आमच्या टीमने आवश्यक मदत पुरवण्यासाठी काम सुरू केले आहे. ते म्हणाले, “माझी सहानुभूती आणि प्रार्थना मृतांच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, या एम्ब्रेर पीटी-एसओजी विमानाने अॅमेझॉन मॅनॉस येथून उड्डाण केले. मुसळधार पावसात विमान उतरण्याचा प्रयत्न करत असताना अपघात झाला आणि त्यात १४ जणांचा मृत्यू झाला.

दरम्यान, मनौस एरोटॅक्सी एअरलाइननेही या घटनेला दुजोरा दिला आहे. चौकशी करत असल्याचे कंपनीने सांगितले. मात्र, अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही.
 
Manaus Aerotaxi Airline ने सांगितले की गोपनीयतेमुळे आम्ही अधिक माहिती देऊ शकत नाही. तपास जसजसा पुढे जाईल तसतशी सर्व आवश्यक माहिती आणि अपडेट दिले जातील, असे ते म्हणाले. काही ब्राझीलच्या प्रसारमाध्यमांनी सांगितले की, मृतांमध्ये अमेरिकन नागरिकांचाही समावेश आहे. तथापि, रॉयटर्सने या वृत्तांची पुष्टी केलेली नाही.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.