दुर्गामातेच्या मूर्तीची समाजकंटकांकडून विटंबना! आरोपी फरार...

    24-May-2023
Total Views |
bareilly-hindu-temple-idol-vandalised

लखनऊ : उत्तर प्रदेशातील बरेली येथील मंदिरात काही समाजकंटकांनी मूर्तींची तोडफोड केल्याची घटना घडली आहे.हे मंदिर दुर्गामातेचे आहे. त्या मंदिरातील मूर्तीची बोटे तोडली गेली असून मातेच्या हातातील चक्र फेकून दिले आहे. त्यामुळे घटनास्थळी पोहोचून हिंदू संघटनांनी या घटनेचा निषेध केलेला आहे. पुजाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. ही घटना दि. २३ मे रोजी घडल्याचे पोलीस तपासात उघड झालेले आहे.
 

bareilly-hindu-temple-idol-vandalised

ही घटना बरेली पोलीस स्टेशन हाफिजगंज परिसरातील आहे. त्या परिसरातील रिठोरा गावात गावात मंदिर बांधण्यात आलेले आहे. येथील पुजारी निर्माण सिंह यांनी या घटनेची पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार , ते दररोज सकाळी पूजा आणि संध्याकाळच्या आरतीसाठी मंदिरात येत. मात्र ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी मंदिरात पोहचल्यावर दुर्गामातेच्या मूर्तीच्या डाव्या हाताची बोटे आणि हातातील चक्र समाजकंटकांनी तोडले होते. तसेच मूर्तीच्या डोक्यावरूल मुकुटही काढून जमिनीवर फेकण्यात आला होता.

 
त्याचबरोबर मंदिरात लावलेला ध्वजही उपटून फेकून दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मंदिराच्या आवारातील केळीच्या रोपाचेही नुकसान झाले आहे. स्थानिक रहिवाशांनीही तक्रारीवर स्वाक्षरी करत आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच समाजकंटकांनी तोडलेल्या मूर्तीचा व्हिडीओ ही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या भाविकांसह हिंदू संघटनेचे कार्यकर्तेही घटनास्थळी पोहोचले. या सर्वांनी पोलिसांकडून आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली.बरेली पोलिसांनी या प्रकरणी हाफिजगंज पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप कोणालाही अटक झालेले नाही.

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.