शेफाली वैद्य अदा शर्मा भेट.. शेफाली यांनी सांगितल्या भावना

    23-May-2023
Total Views |

shefali ada 
 
मुंबई : 'द केरला स्टोरी' चित्रपटाचे प्रयोग अनेक ठिकाणी आयोजित केले जात आहेत. अशातच आरोह वेलणकर आणि मनोज पोचत यांनी पुण्यात चित्रपटाचा प्रयोग आयोजित केला हता. त्यावेळी सुप्रसिद्ध हरहुन्नरी आणि प्रतिभावंत लेखिका शेफाली वैद्य यांनी दिग्दर्शक सुदिप्तो सेन आणि अभिनेत्री अदा शर्मा यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी अदा हिस शेफाली यांनी भारतमातेचे चित्र असलेली फ्रेम भेट म्हणून दिली.
 
शेफाली वैद्य याविषयी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये लिहितात, "आरोह वेलणकर आणि मनोज पोचट यांनी पुण्यात आयोजित केलेल्या #TheKeralaStory च्या विशेष स्क्रीनिंगमध्ये दिग्दर्शक सुदिप्तो सेन, मुख्य अभिनेत्री अदा शर्मा आणि निर्माता विपुल शाह यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. किती दमदार चित्रपट! सुदिप्तो आणि विपुल शाह या दोघांनीही ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या स्वयं-प्रमाणित चॅम्पियन्सच्या असहिष्णुतेबद्दल’ विस्तृतपणे बोलले, सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी देऊनही चित्रपट पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू मध्ये चालू देत नाहीत!"
 
पुढे हिंदूंबाबत वक्तव्यकारात त्या म्हणाल्या, "आपण एका ‘हिंदू बहुसंख्य’ देशात राहतो जिथे हिंदूंना त्यांच्या स्वतःच्या सत्यकथा सांगण्यासाठी सर्व स्तरांवर संघर्ष करावा लागतो, परंतु हैदर सारख्या तिसऱ्या दरातील काल्पनिक चित्रपट जे इझलामिक दहशतवाद्यांना चांगल्या प्रकाशात दाखवतात ते उत्तम सिनेमा म्हणून गौरवले जातात! मला आनंद आहे की शेवटी #TheKashmirFiles आणि #TheKeralaStory सारखे चित्रपट बनत आहेत आणि ते खचाखच भरलेल्या थिएटर मध प्रदर्शित होत आहेत. पण जर आपण एकत्र नसलो, तर तुमच्या राज्यातही #KashmirFiles किंवा #KeralaStory घडू शकते."
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.