‘हाउसफुल ५’ च्या तिकीट खिडकीवर हास्याचा स्फोट; हजारोंच्या संख्येनं प्रेक्षकांची गर्दी

    04-Jun-2025   
Total Views | 18


explosion of laughter at the ticket window of housefull 5


मुंबई : अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित कॉमेडीपट हाउसफुल ५ ची प्रेक्षकांमध्ये जबरदस्त उत्सुकता दिसून येतेय. येत्या ६ जूनला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकणार असून, सध्या त्याची अ‍ॅडव्हान्स बुकिंग जोरात सुरू आहे.

 
अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून कमाईचे नवे विक्रम
इंडस्ट्री ट्रॅकर Sacnilk च्या माहितीनुसार, आतापर्यंत हाउसफुल ५ साठी देशभरात ९,६२५ शोसाठी ६९,८२८ तिकिटं विकली गेली आहेत. यातून सुमारे २.१२ कोटींचा गल्ला जमला आहे. ब्लॉक सिट्स आणि अपेक्षित ओपनिंग लक्षात घेतल्यास, पहिल्या दिवशी ५.६७ कोटींचा गल्ला अपेक्षित आहे.


सर्वाधिक प्रतिसाद कुठे?
महाराष्ट्र आणि दिल्ली-एनसीआर भागात सर्वाधिक अ‍ॅडव्हान्स बुकिंग झाली आहे. त्यानंतर गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि तेलंगणाचा क्रम लागतो. शहरांमध्ये दिल्ली, मुंबई आणि पुणे या ठिकाणी सर्वाधिक शो ठेवण्यात आले आहेत.


भारतातील सर्वात महागडा कॉमेडीपट
हाउसफुल 5 हा या मालिकेतील सर्वात मोठ्या खर्चाचा चित्रपट ठरत आहे. या चित्रपटाचा एकूण खर्च ₹२२५ कोटींवर आहे (प्रिंट व जाहिरात खर्च वगळून). सुरुवातीला निर्मात्यांनी ₹३५० कोटींचा अंदाज व्यक्त केला होता, पण कलाकारांमध्ये झालेले बदल आणि निर्मितीचा फेरविचार यामुळे बजेट कमी करण्यात आले.

काय आहे कथानक?
३० एप्रिल रोजी मालिकेच्या १५ व्या वर्धापनदिनानिमित्त एक टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. एका आलिशान क्रूझवर घडणारी ही कथा आहे. एका अब्जाधीशाचा १०० वा वाढदिवस साजरा होतो आणि तो आपली संपत्ती ‘जॉली’ नावाच्या वारसाला देणार असतो. तेवढ्यात समोर येतात तीन जॉली – जलाबुद्दीन (रितेश देशमुख), जलभूषण (अभिषेक बच्चन) आणि ज्युलियस (अक्षय कुमार). खरी वारसदारी कोणाची? यातून निर्माण होतो गोंधळ आणि सुरू होते कॉमेडीचा झणझणीत खेळ!

हाउसफुल 5 वि. थग लाईफ – बॉक्स ऑफिसवर टायटल क्लॅश
हाउसफुल 5 सध्या देशभरात ५,००० हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित होणार आहे. अशा मोठ्या स्केलवर रिलीज होणाऱ्या या चित्रपटाचा टक्कर कमल हसनच्या थग लाईफ सोबत होणार आहे.



अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121