मुंबई : लोकप्रिय अभिनेते आणि रंगभूमीवरील दमदार हजेरी लावणारे अमोल बावडेकर यांना रविवारी सकाळी अस्वस्थ वाटल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हृदयविकाराचा झटका आल्याचं निष्पन्न झाल्यानंतर तातडीनं अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यांच्या या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. मात्र, सुदैवानं आता त्यांच्या तब्येतीत लक्षणीय सुधारणा होत असून, हॉस्पिटलमधूनच एक सकारात्मक आणि दिलासादायक अपडेट समोर आलं आहे.
अमोल बावडेकर यांचे जिवलग मित्र आणि अभिनेता प्रशांत चौडप्पा ज्यांना प्रेक्षक 'साधी माणसं' मालिकेतील सुधाकर म्हणून ओळखतात यांनी रुग्णालयातून अमोल यांच्या तब्येतीची माहिती दिली. हॉस्पिटलमध्ये भेट दिल्यानंतर त्यांनी एक फोटो शेअर केला आणि लिहिलं Doctor Says THE KING IS BACK!"
प्रशांत यांनी लिहिलं की, "अमोल पूर्वीप्रमाणेच जोशात, हसतमुख आणि एनर्जेटिक होता. मी त्याला विचारलं, ‘काय रे तुला हार्ट अटॅक कसा काय आला?’ तर तो उलट म्हणाला, ‘प्रयोग थांबवायचा नव्हता रे, निर्मात्यांच नुकसान व्हायला नको.’ याचं कामावरचं प्रेमच वेगळं आहे." प्रशांत यांच्याच सांगण्यानुसार, दोन दिवसांपूर्वी पहाटे अमोल यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांच्या पत्नी प्रेरणा बावडेकर आणि जवळचे हितेशभाई यांनी तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेलं, आणि तेव्हाच डॉक्टर्सनी सांगितलं की तीव्र स्वरूपाचा हार्ट अटॅक झालेला आहे. अँजिओप्लास्टी ही एकमेव पर्याय असल्याचं स्पष्ट झालं.
"डॉक्टरांना सांगत होता की मला नाटक करायचं आहे, तीन तास द्या, मी प्रयोग करून येतो. ते ऐकून डॉक्टर म्हणाले तीन तास नाही, आता 30 दिवसही हालचाल नाही!" असं प्रशांत भावूक होत म्हणाले. सुदैवानं अँजिओप्लास्टी यशस्वी झाली. सोमवारी ICUमधून बाहेर काढण्यात आलं. मंगळवारी भेटायला मिळाल्यावर अमोल तितकाच उत्साही आणि ठणठणीत होता. डॉक्टरांनीसुद्धा स्पष्ट सांगितलं "You are perfectly all right. लवकरच प्रयोगही करू शकता."
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.