मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील अनेक पात्रं प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली, पण सर्वाधिक लोकप्रियता मिळवणारी आणि आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी भूमिका म्हणजे जेठालाल गडा. ही भूमिका इतकी लोकप्रिय झाली की आज तिचं नाव घेतलं की लगेच डोळ्यासमोर फक्त दिलीप जोशीच येतात.
पण हीच भूमिका सुरुवातीला दिलीप जोशी नव्हते करणार. निर्माता असित मोदी यांनी आधी इतर काही कलाकारांना ही भूमिका ऑफर केली होती. पण त्यांनी ती नाकारली... आणि नंतर त्यांच्या हातून गेली ती एक अमर भूमिका. जाणून घ्या कोणते होते ते ५ कलाकार जे झाले असते ‘जेठालाल’... पण झाले नाहीत.
१. राजपाल यादव बॉलीवूडमधील लोकप्रिय विनोदी अभिनेता राजपाल यादव याला सर्वप्रथम जेठालालची भूमिका ऑफर करण्यात आली होती. पण त्याने ती स्पष्टपणे नाकारली. कारण त्यावेळी त्याचे लक्ष फक्त चित्रपटांवर होते. शिवाय, एका मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की, "मी कोणाच्या मागे उरलेल्या भूमिका करू इच्छित नाही. माझ्यासाठी खास लिहिलेल्या भूमिका मला हव्या असतात."
२. किकू शारदा 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मधून ओळख निर्माण केलेला किकू शारदालाही 2007 मध्ये ही ऑफर मिळाली होती. पण त्यावेळी त्याला दीर्घकालीन प्रोजेक्ट करायचा नव्हता. त्यामुळे त्याने ही ऑफर नाकारली. आजही तो या निर्णयाबद्दल फारसा बोलत नाही, पण त्या संधीचं महत्त्व आता समजून आलं असेल, यात शंका नाही.
३. योगेश त्रिपाठी 'भाभीजी घर पर हैं' आणि 'हप्पू की उलटन पलटन' मधून लोकप्रिय झालेला योगेश त्रिपाठी देखील जेठालाल होऊ शकला असता. पण त्यावेळी इतर मालिकांमुळे व्यस्त असल्याने त्याने या भूमिकेपासून दूर राहणंच पसंत केलं.
४. अली असगर 'कपिल शर्मा शो'मधून घराघरात पोहोचलेला अली असगरलाही जेठालालची ऑफर आली होती. पण त्याने ती नम्रपणे नाकारली. त्या काळात तो इतर प्रोजेक्ट्समध्ये खूप व्यग्र होता आणि मालिकेच्या वेळापत्रकात बसणं त्याला शक्य नव्हतं.
५. एहसान कुरेशी 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'मधून लोकप्रिय झालेला विनोदी कलाकार एहसान कुरेशी यालाही असित मोदींनी विचारणा केली होती. मात्र त्याने देखील ही भूमिका स्वीकारण्यास नकार दिला. यामागचं कारण मात्र स्पष्टपणे कधीच समोर आलं नाही.
…आणि शेवटी ही भूमिका मिळाली दिलीप जोशींना या सर्व नामांकित कलाकारांनी जेठालालसारखी ऐतिहासिक भूमिका नाकारल्यानंतर ती भूमिकेची जबाबदारी दिलीप जोशींवर आली. त्यांनी त्यात जीव ओतला आणि आज ही भूमिका त्यांच्याच नावाने ओळखली जाते.
कधी कधी एखादी नाकारलेली संधी आयुष्यभर लक्षात राहते… आणि जेठालालची भूमिका याचं सर्वात मोठं उदाहरण!
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.