बालनरेंद्र ते पंतप्रधान-मोदींच्या चित्रांचं अनोखं संग्रह करणारा अवलीया!

    20-May-2023
Total Views |
barelly

बरेली
: बरेलीमधील एका निवृत्त प्राध्यपकांनी पंतप्रधान मोदींची चित्रे रेखाटली आहेत. त्यांचं नाव महेंद्र सक्सेना असं आहे. या चित्रांच्या माध्यमातून त्यांनी नरेंद्र मोदींच्या बालपणापासून ते राजकीय कारकीर्दीपर्यंतचा प्रवास चित्रांच्या माध्यमातून रेखाटला आहे. सुरूवातीला त्यांनी व्यक्तीचित्रे काढली आहेत परंतु, काही काळानंतर त्यांनी नरेंद्र मोदींची चित्रे काढण्यास सुरूवात केली. आता त्यांच्या राहत्या घरात नरेंद्र मोदींची असंख्य व्यक्तीचित्रे पाहायला मिळत आहेत. समाजमाध्यमांवर त्यासंबंधीचा व्हिडीओ व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे या बरेलीमधील निवृत्त प्राध्यपक महेंद्र सक्सेना यांची चर्चा समाजमाध्यमांवर चांगलीच रंगलेली पहायला मिळत आहे.

महेंद्र सक्सेना म्हणाले, आपल्या वाटलेही नव्हते की, देशात हिंदू धर्माला प्राधान्य देणारी सरकार येईल. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला एक नवी दिशा दिली. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाचे मन मोदींशी जुळले गेले. तसेच नरेंद्र मोदींच्या कार्यशैलीमुळे मीसुध्दा प्रभावित झालो अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. त्यामुळेच मी लोककलाऐवजी नरेंद्र मोदींची व्यक्तीचित्रे रेखाटण्याचा निर्णय घेतला, असे ते यावेळी म्हणाले.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.