जुन्या पेन्शन योजनेबाबत काँग्रेसची भूमिका काय? बाळासाहेब थोरातांनी केला खुलासा

    14-Mar-2023
Total Views |
 
Balasaheb Thorat
 
मुंबई : सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाचा दुसऱ्या आठवड्यातील आज तिसरा दिवस आहे. विविध मागण्यांवरुन विरोधक आजही सभागृहात आक्रमक झाले आहेत. जुन्या पेन्शनबाबत 20 लाख कर्मचारी संपवार गेले आहेत. राज्यातलं आणि दिल्लीतलं मोदी सरकार हे फक्त उद्योजकांचा सरकार असल्याचे पटोले म्हणाले. जुन्या पेन्शन योजनेबाबत काँग्रेसची भूमिका सांगताना बाळासाहेब थोरात म्हणाले, "मंत्रालय असो जुनी पेन्शन योजना ही सुरू राहिली पाहिजे या मताचे काँग्रेसचं आमचं वरिष्ठ नेते आहेत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा सुद्धा तो विचार आहे आणि तीन राज्यांमध्ये आम्ही ते सुरू केलेलं आहे."
 
"असं आहे की ज्यावेळेस एखादा कर्मचारी निवृत्त होतो, त्यानंतर त्याचं कठीण जीवन खरं सुरू होत असतं आणि या कठीण वेळी त्याच्या पाठीशी उभं राहणं सरकारची जबाबदारी आहे ती टाळू शकत नाही. आपण सर्वांचीच पुढची पिढी चांगली निघेल असंही कधी नसतं. अनेक अडचणी जीवनापुढे उभ्या राहिलेल्या असतात अशा वेळेस भक्कम पाठिंबा देणं आवश्यक आहे की त्याने आयुष्यभर या देशाची सेवा केलेली आहे, राज्याची सेवा केलेली आहे, तिच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे."
 
"ज्या पद्धतीनं हजारो शेतकरी हजारो महिला, मुलं हे पायी चालत येत आहेत. त्यांच्या पायाला पूर्ण जखमा आहेत.पण चालताहेत. याचा अर्थ कुठेतरी दुःख आहे, कुठंतरी वेदना आहेत. आणि या वेदनाला फुंकर घालण्याची जबाबदारी शासनाची आहे. तुम्ही त्यांच्याशी बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, कोणते दुःख त्यांचे आहेत? काय अडचणी त्यांची आहेत? याबाबतीत सरकारने निर्णय घेतले पाहिजेत. सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये तुम्ही काय बदल केला? त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला का नाही? याचं दोन वेळचं व्यवस्थित झालं का नाही? त्याची मुलं चांगली शिकतात का नाही? हे हे पाहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याला लोककल्याणकारी सरकार म्हणतात. Flyover करणं किंवा metro करणं याच्यावरच जी भाषणं होत आहेत आणि फुलावरही फुलवली जात आहेत. याच्यातून सर्व सामान्य जनता समाधानी होऊ शकत नाही त्याचे दुःख दूर होऊ शकत नाही." असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.