डोंबिवलीत रंगला 'नवरत्न सन्मान २०२५' सोहळा

हेल्पिंग हॅन्ड वेल्फेअर सोसायटीच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन

    05-May-2025
Total Views | 23
डोंबिवलीत रंगला

डोंबिवली,  हेल्पिंग हॅन्ड वेल्फेअर सोसायटी, डोंबिवलीच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील ५० मान्यवर आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत संस्थांना 'नवरत्न' सन्मानाने गौरविण्यात आले. यावेळी दैनिक मुंबई तरुण भारतच्या पायाभूत सुविधा विभागाच्या विशेष प्रतिनिधी गायत्री श्रीगोंदेकर यांना पत्रकारिता क्षेत्रातील लेखन कार्यासाठी नवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डोंबिवली येथील गणेश मंदिर संस्थान, वक्रतुंड सभागृह, डोंबिवली पूर्व येथे रविवार दि.४ मे, रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशन, डोंबिवलीचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विजय चिंचोले आणि माइण्डसेट गुरु दिनेश गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. सामाजिक संस्था, व्यक्ती, कला, नृत्य, गायन, संगीत, साहित्य, क्रीडा, उद्योजक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांना स्मृतिचिन्ह, मेडल, सन्मानपत्र आणि शाल पुरस्कारस्वरूप प्रदान करण्यात आले. यावेळी हेल्पिंग हॅन्ड वेल्फेअर सोसायटीच्या संस्थापक, अध्यक्षा डॉ.प्रियांका कांबळे, सचिव गौरी पाटील, माजी अध्यक्ष समीर चव्हाण आदी उपस्थित होते.
 
हेल्पिंग हॅन्ड वेल्फेअर सोसायटी, डोंबिवली या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सामाजिक संस्थाना नवरत्न पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते. अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या या पूरस्कारासाठी यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातील  संस्थांमधून संस्था आणि वैयक्तिक कार्यकर्त्यांची 'नवरत्न २०२५' या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. यावेळी संस्थेच्या भविष्यातील वाटचालीवर देखील प्रकाश टाकण्यात आला. धावपळीच्या दैनंदिन दिनक्रमात मानसिक आरोग्याचे महत्व याविषयक मोठी चळवळ उभारणार असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा डॉ. प्रियांका कांबळे यांनी सांगितले. तसेच, या चळवळीत मनोदुत म्हणून सहभागी होण्याचे आवाहन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. विजय चिंचोळे यांनी केले.

महाराष्ट्रातून या पुरस्कारासाठी १२२ सामाजिक संस्था आणि वैयक्तिक व्यक्तींनी नोंदणी केली त्यातून ३६ संस्थांना आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना गौरविण्यात आले. कला क्षेत्रातील ९, साहित्य क्षेत्रातील नवरत्नांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

अग्रलेख
जरुर वाचा
२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

चिनी कम्युनिस्ट पार्टी अर्थात ‘सीसीपी’ने तेथील फालुन गोंग साधना अभ्यासकांवर केलेल्या अमानुष छळाविरुद्ध या अभ्यासकांनी शांतपणे आवाहन सुरू केले. त्याला आज २६ वर्षे होत आहेत. दि. २० जुलै १९९९ रोजी ‘सीसीपी’चे नेते जिआंग झेमिन यांनी फालुन गोंग आणि त्याच्या लाखो अनुयायांचा छळ सुरू केला आणि संपूर्ण देशात दहशतीची लाट पसरली. कम्युनिस्ट पक्षाने आपल्या राजकीय दडपशाहीच्या दीर्घ इतिहासात विकसित केलेल्या प्रत्येक छळ तंत्राचा वापर करूनही या अभूतपूर्व हल्ल्याचा सामना करत, फालुन गोंग साधकांनी पाठ फिरवली नाही. त्याऐवजी, ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121