आरोग्य व्यवस्थेत आशा सेविकांचे योगदान

डॉ. भारती पवार : जिल्हा परिषदेतर्फे स्वयंसेविकांचा गौरव

    11-Mar-2023
Total Views |
Dr. Bharti Pawar


नाशिक
: “केंद्रीय पातळीवर आरोग्यासंबंधी कुठलीही योजना राबवायची असेल, तर या योजनेचा पायाभूत घटक हा आमच्या आशा सेविका असतात. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेतले आशा सेविकांचे योगदान हे अनन्यसाधारण आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.
 
मंचावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांसह पदाधिकारी, आशा स्वयंसेविका उपस्थित होते.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील ११२ प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविकांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी डॉ. भारती पवार बोलत होत्या. यावेळी भारती पवार यांच्या संकल्पनेतून महिलांमधील स्तनांचा कर्करोग व गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी करणार्‍या यंत्राचे लोकार्पण करण्यात आले. पेठ तालुक्यात पथदर्शी प्रकल्प म्हणून या यंत्राद्वारे महिलांची आरोग्य तपासणी होणार आहे.

भारतातील असा पहिलाच प्रयोग नाशिक जिल्ह्यात आशा स्वयंसेविकांच्या मदतीने राबविला जाणार आहे. ९ मार्च ते १५ मार्च दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात महिला आरोग्य तपासणी शिबीर राबवले जाणार असल्याचेही डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले.

आरोग्य केंद्राच्या नाटिकेने वेधले लक्ष

धोंडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा सेविकांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर नाटिकेचे सादरीकरण केले. ग्रामीण भागातील महिलांनी अंधश्रद्धेच्या आहारी न जाता वैद्यकीय उपचार घ्यावे, असा संदेश या नाटिकेतून देण्यात आला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी या नाटिकेबद्दल आशा सेविकांचे कौतुक केले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.