मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नाशकात

- शाही स्नानाच्या तारखा होणार जाहीर

    30-May-2025
Total Views | 20

Chief Minister Devendra Fadnavis in Nashik on Sunday
 
नाशिक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार, दि. 1 जून रोजी नाशिक दौर्‍यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत होणार्‍या बैठकीमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान होणार्‍या शाही स्नानाच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. यावेळी कुंभमेळ्याचे यशस्वी आयोजन करण्याच्या उद्देशाने सिंहस्थ प्राधिकरणातील अधिकारी व सदस्यांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर पेशवेकाळापासून वेगवेगळ्या ठिकाणी स्नान करणारे वैष्णव व शैव आखाड्यांचे प्रमुख कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने प्रथमच नाशिकमध्ये एकत्र येणार आहेत.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात 13 प्रमुख आखाड्यांचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी आणि स्थानिक साधू-महंत यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. मागील वेळी नाशकात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा केली होती. याबाबत महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम या प्राधिकरणाचा अभ्यास करत होते.
 
त्यानुसार, प्राधिकरण कसे असावे, याचा आराखडा तयार करण्यात आला असून अंतिम मंजुरीकरिता शासनाकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, बैठकीत निर्वाणी, निर्मोही, दिगंबर, जुना, आवाहन, अग्नी, निरंजनी, आनंद, महानिर्वाणी, अटल, बडा उदासिन, नया उदासिन आणि निर्मल आखाड्याचे प्रतिनिधी सहभागी होतील.
 
परशुराम भवनचे करणार लोकार्पण
 
गेल्या 92 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या ‘चित्पावन ब्राह्मण संघा’ने नाशिकच्या मध्यवर्ती भागात ‘परशुराम भवन’ उभारले आहे. या इमारतीमध्ये व्यावसायिक वापरासाठी जागा, समारंभासाठी स्वतंत्र बँक्वेट हॉल, वसतिगृहासाठी दहा प्रशस्त खोल्या, संस्थेचे कार्यालय तसेच, बेसमेंट पार्किंगपासून टेरेसपर्यंत लिफ्टची सुविधा व पॉवर बॅकअपसह इतर सर्व आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध आहेत.
 
या इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व जलसंपदा व कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. अ‍ॅड. राहुल ढिकले यांच्या उपस्थितीत रविवार, दि. 1 जून रोजी दुपारी 3 वाजता, गुरुदक्षिणा हॉल, बीवायके कॉलेज कॅम्पस, कॉलेज रोड येथील सोहळ्यादरम्यान होणार आहे.
 
 
 
 
 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

“सध्याच्या काळातील संघर्ष बघता, सगळ्या घटनांकडे एका सांस्कृतिक दृष्टिकोनातून बघणे गरजेचे आहे. यासाठी सांस्कृतित राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा “ असे प्रतिपादन राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले. दि. ४ ऑक्टोबर रोजी वैभव केळकर आणि डॉ. मेघना दलाल यांनी लिहिलेल्या आणि दिलीपराज प्रकाशन नें प्रकाशित केलेल्या "पार्थसूत्र" या मराठी आणि "Bow & Beyond" या इंग्लिश पुस्तकाचे प्रकाशन पुण्याच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या भानुबाई नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे पार पडले. या कार्यक्र..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121