आषाढी वारीमध्ये डॉक्टरांची निस्वार्थ वारकरी सेवा

    29-Jun-2025
Total Views |

वाडा : एक सेवाभावाचा उपक्रम म्हणून, पंढरपूर वारीमध्ये दरवर्षी वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट, मुंबई यांच्या सौजन्याने मंडणगड तालुका मेडिकल असोसिएशन आणि वाडा विभाग डॉक्टर असोसिएशन यांच्या मार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वाटप करून मोफत आरोग्य सेवा देण्यात आली.

लाखो भाविकांचा पांडुरंगाच्या भेटीचा सोहळा म्हणजे आषाढी वारी होय. या वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मंडणगड तालुक्यातील डॉक्टर सुशांत रहाटे, डॉक्टर प्रमोद मोरे, डॉक्टर अक्षय पाटणकर, डॉक्टर परेश महाडिक महाड, डॉक्टर संदेश पाडवेकर दापोली, विनय जगडे, शशांक जगडे व वाडा विभाग डॉक्टर असोसिएशन चे डॉक्टर राहुल पाटील, सुभाष पाटील, ह. भ. प. मोरेश्वर महाराज पाटील, कु सुयश पाटील यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी आणि औषध वाटप करून आरोग्य सेवा दिली.

वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा या उदात्त भावनेने प्रेरित होऊन पंढरपूरच्या वारी मार्गासाठी डॉक्टरांच्या वैद्यकीय टीमला व वाडा विभाग डॉक्टर असोसिएशन या सेवाभावी कार्यासाठी सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मोफत आरोग्य तपासणी आणि औषधे वाटप करून वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारा डॉक्टरांचा हा उपक्रम खऱ्या अर्थाने एक सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण आहे, सर्व डॉक्टरांच्या टीमला आषाढी वारी निमित्त वारकऱ्यांसाठी केलेल्या त्यांच्या अतूट सेवेसाठी कौतुक होत आहे.या वारीदरम्यान अकराशे हून अधिक वारकरी माऊलींना आयुर्वेदिय सेवा दिली. गेली तीन वर्ष सातत्याने आयोजित होत असलेले डॉक्टरांचे हे शिबिर यंदाही यशस्वीरित्या पार पडले.