उल्हासनगर, ३० जूनपासून महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असताना, उल्हासनगरच्या विविध समस्यांची राज्य सरकारला माहिती देऊन तोडगा काढण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी शहराशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे मांडणार आहेत.
अनधिकृत बांधकामांच्या नियमितीकरणाच्या प्रक्रियेला गती देणे/ एक खिडकी योजना,प्रमाणपत्र मिळवण्याच्या समस्या सोडवणे, मध्यवर्ती रुग्णालयाची श्रेणी 202 ऐवजी 400 खाटांच्या रुग्णालयात वाढवणे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करणे.मध्यवर्ती रुग्णालयाला स्थानिक औषधे खरेदी करण्यासाठी आणि ऑक्सिजन, नायट्रस आणि स्पिरिटसाठी अनुदान देणे. उल्हासनगर महानगरपालिकेतील शहर अभियंता, कार्यकारी अभियंता आणि इतर महत्त्वाची पदे तातडीने भरली जावी . महानगरपालिका पाण्याचा स्वतंत्र स्रोत विकसित करणे, 178 डी. एल. पाणी राखीव ठेवणे, शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई, शहरात चालणाऱ्या अनधिकृत व्यवसायांना आळा घालणे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मर्यादित क्षेत्राचा विस्तार करणे, म्हारळ गावात पाणी पुरवठा योजनेसाठी जमीन उपलब्ध करून देणे, म्हारळ वरप कम्बा गावासाठी स्वतंत्र पोलिस स्टेशन सुरू करणे, प्राथमिक आरोग्य, अग्निशमन केंद्र, डम्पिंग ग्राउंड उपलब्ध, पाणी वितरणासाठी निधी, वीज वितरण साठी निधी उपलब्ध करणे. लाड पागे समितीनुसार श्रेणी 3 अंतर्गत महानगरपालिकेच्या निवृत्त स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वारसा ची नियुक्ती करणे. शिधावाटप विभागाशी संबंधित घोटाळ्याचा तपास करन्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.