नवी दिल्ली : (Shubhanshu Shukla) 'ॲक्सिओम-४' या मिशनअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेलेले भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे १५ जुलै रोजी पृथ्वीवर परतणार आहेत दरम्यान परतीच्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी शुभांशू यांनी या एक संदेश दिला आहे. "हा एक अविश्वसनीय प्रवास होता. या मिशनमध्ये सहभागी असलेल्या लोकांमुळे तो अद्भुत आणि अविश्वसनीय होऊ शकला," असे शुभांशू त्यांच्या निरोपाच्या भाषणात म्हणाले.
शुभांशू शुक्ला यांच्यासह या मोहिमेत सहभागी झालेले चारही अंतराळवीर सोमवार, दि. १४ जुलै रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी ४.३५ वाजता आयएसएसवरून निघणार आहेत. मंगळवारी, १५ जुलैला दुपारी ३ वाजता ते कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ उतरण्याची अपेक्षा आहे. पुन्हा एकदा संपूर्ण जगाचे लक्ष या परतीच्या प्रवासाकडे लागले आहे, विशेषतः भारताचे.
भारत आजही 'सारे जहाँ से अच्छा' दिसतो
शुभांशू शुक्ला त्यांच्या निरोपाच्या भाषणात म्हणाले की, "४१ वर्षांपूर्वी एक भारतीय अंतराळात गेले होते आणि त्यांनी आपल्याला सांगितले होते की अंतराळातून भारत कसा दिसतो, कुठेतरी आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं आहे की आज भारत कसा दिसतो, मी तुम्हाला सांगतो. आजचा अंतराळामधून महत्त्वकांक्षी दिसतो, आजचा भारत निर्भीड दिसतो, आजचा भारत आत्मविश्वासाने भरलेला दिसतो, आजचा भारत अभिमानाने भरलेला दिसतो, याच सर्व कारणांमुळे मी पुन्हा एकदा म्हणू शकतो की, भारत आजही 'सारे जहाँ से अच्छा' दिसतो. लवकरच जमिनीवर भेटू"
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\