जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला? सुप्रिया सुळेंची मोठी प्रतिक्रिया

    14-Jul-2025   
Total Views |


मुंबई : शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू असताना आता यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी राजीनामा पाहिलेला नाही असे त्या म्हणाल्या.


सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "जयंत पाटील यांचा राजीनामा मी तुमच्याच चॅनेलवर पाहिला. त्यांचा राजीनामा मी बघितलेला नाही, मी ऐकलेला नाही आणि वाचलेला नाही. तुमच्या चॅनलला बातमी देणारा जो सूत्र आहे, त्याने दिलेली बातमी विचार करुन लावा. मी तरी कुठलाही राजीनामा पहिला नाही, ऐकला नाही आणि वाचलाही नाही. उद्या पक्षाची बैठक आहे, त्यात कळेलच. मी जयंत पाटलांशी रोज बोलते. जी घटना आमच्या आयुष्यात झाली नाही, त्याबद्दल काय बोलणार?" असे त्या म्हणाल्या.


त्या पुढे म्हणाल्या की, "एका राजकीय पक्षात किंवा संघटनेत जी जबाबदारी पडेल ती करायला प्रत्येक कार्यकर्ता तयारच असतो. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे हे सगळे संघर्ष करणारे आहेत. कितीही आव्हाने आली तरी काही लोक संघर्ष करायला तयार असतात. त्यामुळे त्यांनी कालही संघर्ष केला, आजही करतील आणि उद्याही करतील," असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.



अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....