आतापर्यंतची सर्वाधिक मासिक 'ओरिजिनेट लोडिंग' जाणून घ्या

मध्य रेल्वेची ऑक्टोबर-२०२३ मध्ये सर्वोत्तम मालवाहतूक लोडिंग

    13-Nov-2023
Total Views |
Central Railway Originate Loading

मुंबई :
मध्य रेल्वेचे ऑक्टोबर-२०२३ महिन्यात ७.३५ दशलक्ष टन मालवाहतूक केली, जी ऑक्टोबर-२०२२ महिन्यातील ५.९७ दशलक्ष टन लोडिंगच्या तुलनेत २३.०१ टक्के अधिक आहे. ऑक्‍टोबरच्‍या कोणत्याही महिन्‍यामध्‍ये हे आतापर्यंतचे सर्वाधिक मासिक ओरिजिनेट लोडिंग आहे.

मध्य रेल्वेने महिन्याचे ७.०७ मेट्रिक टनाचे उद्दिष्ट ओलांडले, जे ४ टक्क्यांनी वाढले आहे. हि वाढ ऑक्टोबरच्या कोणत्याही महिन्यातील सर्वोत्तम लोडिंग आहे.

नेट टन किलोमीटर (NTKMs) ऑक्टोबर-२०२२ मध्ये ३,३५९ दशलक्ष झाली, जी ऑक्टोबर-२०२३ मध्ये ४,३८६ दशलक्ष झाली. म्हणजेच सुमारे २१.९० टक्क्यांची वाढ झाली आहे.

मध्य रेल्वेने एप्रिल-ऑक्टोबर २०२३-२४ या कालावधीसाठी ४९.०३ मेट्रिक टन लोडिंग नोंदवले आहे, जे एप्रिल ते ऑक्टोबर-२०२२ मध्ये ४३.९८ मेट्रिक टन होते, त्यात ११.५० टक्के वाढ झाली आहे.

माल वाहतुकीतून मध्य रेल्वेला ऑक्‍टोबर-२०२२ मधील ६३६ कोटी रुपयांच्या तुलनेत ऑक्‍टोबर २०२३ मध्‍ये ८०२ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे, जो मागील वर्षीच्या तुलनेत २६.१० टक्के जास्त आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.