बिग बॉस मराठीचा ५वा सीझन अवघ्या ७० दिवसांत बंद होणार?

    21-Sep-2024
Total Views | 208
 
big boss
 
 
मुंबई : कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व सध्या चांगलंच चर्चेत आहे. रितेश देशमुख या सीझनचे होस्ट असून अनेक नव्या गोष्टी या पर्वात घडताना पाहिल्या. पण आता बऱ्याच लवकर घरात पत्रकारांची परिषद झाल्यामुळे अवघ्या ७० दिवसांमध्येच हा सीझन बंद होणार का? अशा चर्चा सध्या रंगल्या आहेत. १०० दिवसांऐवजी मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन लवकर गाशा गुंडाळणार असे नेटकरी म्हणत आहेत.
 
बिग बॉसच्या घरात पत्रकार परिषद झाली असूनृ ही पत्रकार परिषद आजच्या (२१ सप्टेंबर) एपिसोडमध्ये दाखवण्यात येणार आहे. साधारणपणे बिग बॉसचा फिनाले जवळ आला की पत्रकार परिषद घेतली जाते. बिग बॉस मराठी सुरू होऊन फक्त ५३ दिवस झाले आहेत, अशातच अचानक पत्रकार परिषद झाली, त्यामुळे हा शो इतक्या लवकर संपणार का? असं शोचा प्रोमो पाहून प्रेक्षक विचारत आहेत.
 
बिग बॉसच्या घरात झालेल्या या पत्रकार परिषदेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करून हा शो लवकर संपणार असल्याचं म्हटलं आहे. ‘एवढ्या लवकर पत्रकार?’ ‘६ ऑक्टोबरला फिनाले होणारे.. टॉप 5: अभिजित, सूरज, अंकिता, निक्की अरबाज’, एवढ्या लवकर पत्रकार परिषद?? एवढा जास्त टीआरपी असून सुद्धा’ ‘१०० दिवसांचा शो आहे ७० दिवसामधे नका संपवू,’ अशा कमेंट्स या व्हिडीओवर आहेत.
 

big boss  
 
तसेच, या प्रोमोशिवाय आणखी एक रील व्हायरल होत आहे, ज्यात बिग बॉस मराठी ५ चा ग्रँड फिनाले ६ ऑक्टोबर रोजी होणार असं म्हटलं आहे. दरम्यान, बिग बॉस मराठीच्या टीम किंवा चॅनलकडून या शोच्या ग्रँड फिनालेची तारीख जाहीर करण्यात आली नाही. पण नुकतीच झालेली पत्रकार परिषद आणि चर्चायामुळे शो संपणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याशिवाय लवकरच हिंदी बिग बॉसचे १८ वे पर्व सुरु होणार असून त्यामुळेही असं होईलं असंही म्हटलं जात आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121