मुंबईच्या डबेवाल्यांना ही लागले वारीचे वेध; १७ आणि १८ जुलै रोजी डबेवाला सेवा बंद

मुंबई डबेवाला संघटनेने दिली माहिती

    16-Jul-2024
Total Views | 55
 
 

मुंबई
 
'टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ती चालावी पंढरीची !' असा जयघोष करत आज आषाढी एकादशीनिमित्त मुंबईच्या डबेवाल्यांनी पाऊलही पंढरपूरच्या दिशेने चालली आहेत. दरवर्षी मुंबईचा डबेवाला हा आषाढीनिमित्त पंढपूर यात्रेत सहभागी होतो. यानिमित्ताने दोन दिवस मुंबईचा डबेवाला सेवा ही बंद असते.
 
संतांच्या पालख्यां पंढरीच्या वाटेला लागल्या आहेत. वारीत सहभागी होण्यासाठी तसेच पंढरपुरात पांडूरंगाचे दर्शन घेण्याची आस मुंबईच्या डबेवाल्यांनाही लागली आहे. डबेवाला कामगार मुंबईत जरी काम करत असला तरी त्याची वारी कधी चुकली नाही वारीला जाण्यासाठी डबेवाला कामगारांनी दोन दिवसांची रजा जाहीर केली आहे, अशी माहिती मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली आहे.
 
त्यामुळे बुधवार, दिनांक १७ जुलै व गुरुवार, दि. १८ जुलै रोजी डबेवाला बंद ठेवली आहे. मंगळवार दिनांक १६ जुलै रोजी दिवसभर डबेवाले काम करतील व रात्री पंढरपुरला रवाना होतील. बुधवार, दि. १७ रोजी एकादशीला शासकीय सुट्टी आहे. त्यादिवशी डबेवाले पांडूरंगाचे दर्शन घेतील व गुरुवार, दि. १८ वार रोजी द्वादशीचा उपवास पंढरपुरात सोडत पुढे ते मुंबईच्या दिशेने रवाना होतील. शुक्रवार, दि. १९ जुलै रोजी डबेवाले नेहमीप्रमाणे कामावर हजर होतील.
 
"डबेवाल्यांची शेकडो वर्षाची वारीची परंपरा आहे. दरवर्षी तो सुट्टी घेऊन पंढरपुरला पांडूरंगाच्या दर्शनाला जातो या मुळे काही ग्राहकांची गैरसोय होणार आहे त्या बद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करतो.तसेच, पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना शासनातर्फे विमा संरक्षण देणारी 'विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र’ योजना लागू केल्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभारी आहोत. या निर्णयामुळे लाखो वारकऱ्यांना शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे", असेही तळेकर म्हणाले.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121