महेश-लक्ष्या पुन्हा दिसणार; कसे? महेश कोठारेंनी दिलं उत्तर

    29-Apr-2024
Total Views | 108
AI च्या माध्यमातून पुन्हा लक्ष्मीकांत बेर्डे साकारणार- महेश कोठारे
 
 

laxmikant berde 

रसिका शिंदे-पॉल

मुंबई : ‘हि दोस्ती तुटायची नाय’ हे गाणं खऱ्या अर्थाने ज्या मित्रासाठी साकारलं त्याच्यासोबत म्हणजेच अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डेंसोबत (Laxmikant Berde) पुन्हा एकदा काम करण्याची इच्छा दिग्दर्शक-अभिनेते-निर्माते महेश कोठारे यांनी ‘महाएमटीबी’च्या Unfiltered गप्पा with कलाकारच्या पॉडकास्टमध्ये बोलताना व्यक्त केली. सध्या ‘झपाटलेला ३’ चित्रपटामुळे महेश कोठारे (Mahesh Kothare) चर्चेत असून याही चित्रपटात कोणती नवी टेक्नॉलॉजी पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
 
 
laxmikant berde
 
लक्ष्मीकांत बेर्डेंसोबत आजवर महेश कोठारे यांनी अनेक चित्रपट केले. 'धुमधडाका', 'दे दणा दण', 'थरथराट'. पण आता पुन्हा एकदा लक्ष्या सोबत काम करणार असं म्हणत महेश कोठारे म्हणाले की, “लक्ष्मीकांत बेर्डेसोबत पुन्हा काम करण्याची इच्छा आहे. आणि AI च्या माध्यमातून मला लक्ष्मीकांत बेर्डेला रिक्रिएट करायचं आहे. आणि ती इच्छा मी पुर्ण करुन दाखवणारच”, असं म्हणत लक्ष्मीकांत बेर्डेला मी पुन्हा आणणार असे ठाम विश्वास महेश कोठारे यांनी व्यक्त केला.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

महाराष्ट्र हे वीजनिर्मितीत भारतातील सर्वांत आघाडीचे राज्य. देशात निर्माण होणार्या एकूण विजेच्या १५ टक्के विद्युतनिर्मिती ही एकट्या महाराष्ट्रात होते. परंतु, तरीही मागणीचे प्रमाण हे वीजनिर्मितीपेक्षा जास्त असल्याने आज राज्य सरकार नवीकरणीय ऊर्जानिर्मितीवर भर देत आहे. अशातच नुकतीच राज्य सरकारने मोठी वीजदरकपात जाहीर केली. ज्यामुळे आता पुढील पाच वर्षे वीजबिल वाढणार नाही, तर कमी होणार आहे. तेव्हा राज्यातील वीज ग्राहकांना नेमका हा लाभ कसा मिळणार, यासंबंधी महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधार कंपनीचे स्वतंत्र संचालक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121