एक तिची गोष्ट' नाटकाचा शानदार प्रिमियर

    02-Jul-2025   
Total Views | 7

मुंबई
:'एक तिची गोष्ट' नृत्यनाट्याचा शानदार प्रिमियर सोहळा रविंद्र नाट्य मंदिर येथे नुकताच संपन्न झाला. सिनेनाट्य, राजकारण, साहित्य, उद्योग व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी आवर्जून उपस्थित होते.

'मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स' या निर्मिती संस्थेने, 'थिएटरऑन एंटरटेनमेंट' आणि 'पी एस डी जी स्टुडिओज प्रोडक्शन' यांच्या साथीने ‘एक तिची गोष्ट’ रंगमंचावर आणली आहे. ज्येष्ठ लेखक कै.मधुसूदन कालेलकर यांचा वारसा समर्थपणे पुढे नेत गौरी कालेलकर-चौधरी आणि सिद्धेश चौधरी यांनी 'मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स' या निर्मिती संस्थेची स्थापना केली आहे. संस्थेचे सदस्य परी तेलंग आणि शंतनू तेंडुलकर ह्यांचे सहकार्य यासाठी लाभले आहे.

या सृजनशील कलाकृतीचे खास आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर आणि त्यांची मुलगी आस्मा खामकर यांच्या संगीत, अभिनय, नृत्याची बहारदार अदाकारी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. या दोघींसोबत अभिनेता ओंकार गोखले या नाटकात आहे. याचे लेखन अभिनेता विराजस कुलकर्णी तर सूरज पारसनीस, विराजस कुलकर्णी यांनी दिग्दर्शन केले आहे.

'एक तिची गोष्ट' या नावावरूनच हे नाटक काहीतरी निराळं असणार याची कल्पना येत असली तरी त्याचे सादरीकरण नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. 'एक तिची गोष्ट' च्या संपूर्ण टीमचं सध्या नाट्यरसिकांकडून कौतुक होतयं. अचाट, अफाट उर्जा असलेल्या या नाटकाचा हा रंग उत्तरोत्तर असाच चढेल हे निश्चित.

आर्या आंबेकर, वैशाली सामंत, ऋषिकेश रानडे यांनी यातील गाणी स्वरबद्ध केली आहेत. संगीत निषाद गोलांब्रे यांचे आहे. चाळीशीतली अनया आणि तिच्या आयुष्यात आलेली एक किशोरवयीन मुलगी या दोघींच्या भावविश्वातून या नृत्यनाटिकेची कथा उलगडते.

अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

चिनी कम्युनिस्ट पार्टी अर्थात ‘सीसीपी’ने तेथील फालुन गोंग साधना अभ्यासकांवर केलेल्या अमानुष छळाविरुद्ध या अभ्यासकांनी शांतपणे आवाहन सुरू केले. त्याला आज २६ वर्षे होत आहेत. दि. २० जुलै १९९९ रोजी ‘सीसीपी’चे नेते जिआंग झेमिन यांनी फालुन गोंग आणि त्याच्या लाखो अनुयायांचा छळ सुरू केला आणि संपूर्ण देशात दहशतीची लाट पसरली. कम्युनिस्ट पक्षाने आपल्या राजकीय दडपशाहीच्या दीर्घ इतिहासात विकसित केलेल्या प्रत्येक छळ तंत्राचा वापर करूनही या अभूतपूर्व हल्ल्याचा सामना करत, फालुन गोंग साधकांनी पाठ फिरवली नाही. त्याऐवजी, ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121