जैसलमेर - माळढोक प्रजनन केंद्रात हलला तिसऱ्यांदा पाळणा

    18-Apr-2024
Total Views | 48
GIB



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
राजस्थानमधील जैसलमेर येथील माळढोक (GIB) प्रजनन केंद्रामध्ये तिसऱ्या पिल्लाचा जन्म झाला आहे. या केंद्रात २०२४ सालात जन्मलेले हे तिसरे पिल्लू असून दोन आठवड्यापूर्वी दोन पिल्लांचा जन्म झाला होता (GIB). देशात अंदाजे १५० च्या संख्येत शिल्लक राहिलेल्या या नष्टप्राय पक्ष्याच्या संवर्धनाच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण बाब आहे. (GIB)
देशातील नष्टप्राय प्रजातींच्या यादीत माळढोक या पक्ष्याच्या समावेश होतो. या पक्ष्याच्या संवर्धनासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, भारतीय वन्यजीव संस्थान (डब्लूआयआय) आणि राजस्थान वन विभाग विशेष प्रयत्न करत आहेत. यासाठी जैसलमेर जिल्ह्यातील सैम येथे माळढोक प्रजनन केंद्र उभारण्यात आले आहे. 'डब्लूआयआय'मधील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाअंतर्गत या केंद्राचे कामकाज चालते. याठिकाणी पिजराबंद अधिवासात माळढोक पक्ष्यांची पैदास केली जाते. या केंद्रात ५ आणि ८ एप्रिल रोजी दोन पिल्लांचा जन्म झाला होता. त्यानंतर आता १७ एप्रिल रोजी केंद्रात तिसऱ्या पिल्लाचा जन्म झाला आहे.


या केंद्रामधील माळढोकच्या जोडीने अंड दिल्यानंतर 'डब्लूआयआय'च्या तज्ज्ञांकडून ते ताब्याात घेतले जाते. त्यानंतर या अंड्याच्या कृत्रिम उबवणीची प्रक्रिया सुरू होती. त्यातून साधारण २० ते २२ दिवसानंतर पिल्लाचा जन्म होतो. नैसर्गिक अधिवासातील माळढोकची घट होणारी संख्या पाहता, हे प्रजनन केंद्र या प्रजातीसाठी आशेचा किरण आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121