मुंबई : (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उध्दव ठाकरे व खा. संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी भाजप आमदार राम कदम यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे.
दरम्यान, विधासभाध्यक्ष सामना वृत्तपत्रात अवमानकारक शब्द वापरल्याप्रकरणी सदर हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. तसेच, या हक्कभंग प्रस्तावाबाबत तपासून पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन तालिका अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी दिले आहे.
विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी ठाकरे गट व शिंदे गट या दोन्ही गटांच्या आमदार अपात्रतेबाबत निर्णय दिल्यानंतर त्यांच्याविरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे. तसेच, पुढील कार्यवाहीकरिता सभापतींनी हा प्रस्ताव महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेषाधिकार समितीकडे पाठविला आहे.