मुंबई : दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २० फेब्रुवारी रोजी मुंबईत संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात वर्षभर काम करणाऱ्या कलाकारांना त्यांच्या अभिनयाची पोचपावती मिळाली. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात किंग खान शाहरुख खान याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर, अभिनेता बॉबी देओल आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांना ‘ॲनिमल’ चित्रपटासाठी गौरवण्यात आले.
दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. यात शाहरुख खान, राणी मुखर्जी, बॉबी देओल, शाहीद कपूर आणि नयनतारा अनेक कलाकार उपस्थित होते.
दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार २०२४ - विजेत्यांची यादी
सर्वोत्कृष्ट अभिनेता - शाहरुख खान (जवान)
सर्वोतृष्ट अभिनेत्री : नयनतारा (जवान)
सर्वोत्कृष्ट खलनायक (निगेटिव्ह रोल) - बॉबी देओल (ॲनिमल)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - संदीप रेड्डी वांगा (ॲनिमल)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक) - विकी कौशल (सॅम बहादुर)