अभिनेते सयाजी शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल!
11-Oct-2024
Total Views | 62
मुंबई : जेष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते सयाजी शिंदे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भूजबळ, मंत्री सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या प्रमुख उपस्थित हा पक्षप्रवेश पार पडला.
सयाजी शिंदे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक!
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "मी जास्त चित्रपट पाहत नाही. पण सयाजीरावांचे काही चित्रपट पाहिले. त्यांनी या क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवला आहे. सयाजी शिंदे यांनी अनेक सामाजिक उपक्रमांचे नेतृत्व केले आहे. सह्याद्री देवराई या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ते राज्यभर वृक्षारोपण करतात आणि त्यांच्या योग्य वाढीवर देखरेख ठेवतात. त्यांचं काम प्रशंसनीय आहे. त्यांच्याशी आम्ही अनेक विषयांवर सखोल चर्चा केली. सयाजी शिंदे हे पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करतील," अशी घोषणा यावेळी अजित पवारांनी केली.