
टायटनचे मोठे पाऊल - कार्टलेन मध्ये 'इतके' टक्के अधिकचे शेअर्स
टाटा उद्योग समुहाची नावाजलेली घड्याळ कंपनी टायटन ने कार्टलेन मध्ये अधिकचे २७.२ टक्के घेऊन आपला स्टेक ९८.२८ टक्के इतका वाढला असून साधारण ४६२१ कोटींचा हिस्सा टायटन ताब्यात घेतला आहे. आज या निर्णयाची घोषणा टायटनकडून करण्यात आली आहे.
मिथुन संचेती, श्रीनिवासा गोपालन हे कार्टलेन कंपनीचे संस्थापक आहेत.या दोघांकडे कंपनीचा सुमारे २७ टक्के हिस्सा आहे. दोन्ही कंपन्यांनी याची घोषणा केली. कार्टलेन ही शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपनी नसली तरी टायटनकडे याचे होल्डिंग आले आहे. कार्टलेनला आर्थिक वर्ष २३ पर्यंत २१७७ कोटींचा निव्वळ नफा झाला होता. सगळ्या कायद्याच्या तरतूदी व नोंदणी या प्रकिया ३१ ऑक्टोबर पर्यंत करण्यात येतील.
याविषयी बोलताना कार्टलेन कंपनीचे संस्थापक व कार्यकारी अधिकारी मिथुन सचेती म्हणाले, भविष्याचा विचार करता कॅरेटलेनसाठी टायटन आणि प्रतिष्ठित टाटा समूहापेक्षा आदर्श डेस्टिनेशन असूच शकत नाही, जे कॅरेटलेनला अधिकाधिक मजबूत होण्यासाठी योग्य संधी प्रदान करेल. झपाट्याने वाढणारी परवडणारी आणि सुलभ दागिन्यांची बाजारपेठ पाहता कॅरेटलेनची सुरुवात २००८ मध्ये निव्वळ ऑनलाइन ब्रँड म्हणून करण्यात आली. टायटनने पहिल्यांदा २०१६ मध्ये कॅरेटलेनमध्ये गुंतवणूक केली होती आणि गेल्या ८ वर्षांत तनिष्क या ज्वेलरी ब्रँडच्या भागीदारीत कॅरेटलेनमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे."