केंद्र सरकारच्या इंडियन रेअर अर्थ इंडिया लिमिटेडने भारतात टायटॅनियम स्लॅग उत्पादनासाठी करार केला आहे. अणुऊर्जा विभागाखालील केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी(सीपीएसई) व उस्त कामेनोगोर्स्क टायटॅनियम व मॅग्नेशियम प्लांट (यूकेटीएमपी जेएससी) कझाकस्तान यांनी आयआरईयूके टायटॅनियम लिमिटेड ही भारत कझाक संयुक्त उपक्रम कंपनी(जेव्हीसी) स्थापन करण्यासाठी करार केला.
Read More
टायटननंतर आता ट्रायटन ही पाणबुडी १२ हजार फूट खोलवर जाण्यास सज्ज झाली आहे. दरम्यान, पुन्हा एकदा टायटॅनिक या महाकाय जहाजाचे भग्नावशेष पाहण्यासाठी जाणार आहे. यात टायटनप्रमाणेच अब्जाधीज व्यक्ती असतील तर या पाणबुडीची किंमत १६६ कोटी रुपये इतकी आहे.
'टायटॅनिक' (Titanic) चित्रपटात कॅप्टनची भूमिका साकारणारे अभिनेते बर्नार्ड हिल यांचे ५ मे २०२४ रोजी निधन झाले. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी (Titanic) अखेरचा श्वास घेतला. आजवर त्यांनी अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये महत्वपुर्ण भूमिका साकारल्या होत्या.
टायटन कंपनीने आपला चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. कंपनीला ३१ मार्च २०२४ पर्यंत इयर बेसिसवर ७८६ कोटींचा नफा झालेला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत कंपनींच्या नफ्यात ७.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. टायटन कंपनीच्या उप ब्रँड असलेले तनिष्क, कार्टलेन यांनाही चांगला नफा झाला आहे. मुख्यतः लग्नाच्या सिझन मध्ये मागणीत वाढ झाल्याने टायटन कंपनीच्या विक्रीत वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तिमाहीत कंपनीला ७३४ कोटींचा निव्वळ नफा झाला होता.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत इंडियन स्वच्छता लीग मोहिमेत १५ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर हा पंधरवडा स्वच्छता लीग म्हणून साजरा केला जात आहे. इंडियन स्वच्छता लीग या उपक्रमातंर्गत ठाण्यातुन 'ठाणे टायटन्स' मैदानात उतरले आहे. या संघाच्या बोधचिन्हाचे अनावरण संघाचे कर्णधार व प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांच्या हस्ते व महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे मंगळवारी करण्यात आले.
टाटा उद्योग समुहाची नावाजलेली घड्याळ कंपनी टायटन ने कार्टलेन मध्ये अधिकचे २७.२ टक्के घेऊन आपला स्टेक ९८.२८ टक्के इतका वाढला असून साधारण ४६२१ कोटींचा हिस्सा टायटन ताब्यात घेतला आहे. आज या निर्णयाची घोषणा टायटनकडून करण्यात आली आहे.
अटलांटिक महासागरात गेल्याच महिन्यात टायटन पाणबुडीची दुर्घटना घडली. ही पाणबुडी बनवणारी ओशनगेट या कंपनीने शुक्र या ग्रहावर वसाहत उभारण्याची घोषणा केली आहे. या योजनेचे ‘ह्यूमन टू व्हेनस’ असे नामकरण करण्यात आले आहे. त्या अंतर्गत येत्या २० वर्षात म्हणजेच २०५० पर्यंत शुक्र ग्रहावर वास्तव्य करण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले जाणार आहे.
१९१२ मध्ये समुद्रात बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी ५ अब्जाधीशांना घेऊन निघालेली टायटन पाणबुडीचा अपघात झाला. त्यात पाणबुडीमध्ये असणाऱ्या पाचही अब्जाधीश प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक देशांचे बचाव पथक त्या हरवलेल्या पाणबुडीचा शोध घेण्यात गुंतले होते. यूएस कोस्टगार्ड्सने सांगितले की, दि. २२ जून रोजी टायटॅनिक जहाजाजवळ त्याचा अवशेष सापडला. त्यानंतर पाणबुडीची ऑनर कंपनी ओशनगेटने अपघाताची पुष्टी केली.
टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी लोकांना घेऊन जाणारी पाणबुडी अटलांटिक महासागरात बेपत्ता झाली आहे. पाणबुडीचा माग काढण्यासाठी शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.ही पाणबुडी बेपत्ता झाली तेव्हा त्यात किती लोक होते हे स्पष्ट झालेले नाही. छोट्या पाणबुड्या अधूनमधून पर्यटकांना आणि तज्ञांना टायटॅनिकचा नाश पाहण्यासाठी घेऊन जातात. त्यासाठी पैसे घेतले जातात. टायटॅनिकच्या अवशेषापर्यंतच्या प्रवासासाठी हजारो डॉलर खर्च येतो. टायटॅनिकचे अवशेषापर्यत पोहचायला आणि परत यायला आठ तास लागतात. टायटॅनिकचे अवशेष अटलांटिक महासागराच्य
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर काल (२९ मे रोजी) आयपीएल २०२२ चा समारोप झाला. यावेळी स्टेडियमची प्रेक्षकक्षमता १ लाख ३० हजार होती. स्टेडियममध्ये उपस्थित १ लाखपेक्षा जास्त प्रेक्षकांनी ‘वंदे मातरम्’ चे सामुहिक गायन केले. १ लाख लोकांनी सामूहिक 'वंदे मातरम्' गाण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.
‘टिटॅनिक’च्या बुडण्याबाबत आजही ब्रिटनमध्ये संशोधन चालूच असतं. वेगवेगळे संशोधक वेगवेगळ्या अंगाने या घटनेचा वेध घेत असतात. काही वेगळे निष्कर्ष हाती आले, तर ते आवर्जून १४ एप्रिलचा मुहूर्त साधून प्रसिद्ध केले जातात. परवाच्या १४ एप्रिलला असाच एक नवा संशोधन निष्कर्ष प्रसिद्ध झाला.
अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सलग चौथ्या दिवशी भांडवली बाजार घसरणीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बुधवारी ९३७.६६ अंशांनी घसरणीसह बंद झाला. इंडसइंड बँक आणि टायटनचा शेअर सर्वात जास्त ४-४ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. संपूर्ण शेअर बाजारात घसरणीत बँकींग आणि मेटल शेअर पुढे आहेत. यापूर्वी शेअर बाजारात सप्टेंबरमध्ये चार दिवस सलग घसरण नोंदवण्यात आली होती.
कोरोनाशी सामना करण्यासाठी युएई सरकारने नुकताच आपल्या कायद्यात बदल केला आहे. या नव्या निर्णयानुसार आता तेथे व्यवसाय करणार्या परदेशी नागरिकांना पूर्ण मालकीची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे दोन ते तीन वर्षांपासून तळागाळातील विकासामध्ये वाढ होणार असल्याचे युएई सरकारच्यावतीने सांगण्यात आले आहे.
प्रो कब्बडीच्या ७ व्या पर्वाला आजपासून सुरुवात होणार आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या या लीगमध्ये ७५ दिवसात एकूण १३७ सामने होणार आहेत.पहिला सामना हैदराबादच्या गाचीबावली इनडोअर स्टेडियमवर यू मुंबा आणि तेलुगू टायटन्समध्ये रंगणार आहे.
तेलगू टायटन्सचे माजी खेळाडू एस. महालिंगम याचा ९ सप्टेंबरला दुपारी अपघाती मृत्यू झाला. तो अवघ्या २७ वर्ष्याच्या होता.
संगणक युगात आलेला, ‘टिटॅनिक’च्या ऐवजी ‘टायटॅनिक’ हे फैनाबाज (म्हणजे फॅशनेबल) अमेरिकन नाव घेऊन आलेला हा नवा चित्रपट स्पेशल इफेक्ट्समुळे जगभर गाजला.