आर्थिक फसवणुकीविरोधात सुरक्षिततेच्या उपाययोजना

    10-Aug-2023
Total Views | 63
Security measures against financial fraud


‘फिनटेक’ कंपन्या आधुनिक ‘डिजिटल’ तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच या ‘फिनटेक’ कंपन्या कशाप्रकारे घोटाळेबाजांच्या पुढे राहत आहेत आणि गुंतवणूकदारांना सक्षम करत आहेत, याबद्दल आजच्या लेखात माहिती करुन घेऊया.
 
 
घोटाळेबाजांचा सामना करण्यासाठी गुंतवणूकदारांमध्ये जागरूकतेचा प्रसार

‘फिनटेक’ कंपन्या सामान्य फसवणुका आणि नियामकांची भूमिका (जसे सेबी, आयआरडीए इत्यादी) याबाबत मूलभूत माहिती देण्यासाठी व्यापक उपक्रम राबवतात. ज्यामुळे कोणतीही फसवणूक आधीच ओळखता येते. लहान व्हिडिओ, ई-मेलर्स, वेबिनार्स आणि सोशल मीडिया पोस्ट्स अशा आधुनिक साधनांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना बाजारपेठेतील प्रचलित घोटाळे व फसवणूक पद्धतींबाबत जागरूक केले जात आहे. ‘एआय’-आधारित चॅटबोट्सनी युजर परस्परसंवादामध्ये अधिक सुधारणा केली आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांना विशिष्ट अनपेक्षित संदेश किंवा ई-मेल्सबाबत शंका असल्यास व्हॉट्सअ‍ॅप किंवा इतर कोणत्याही सक्षम मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून ते प्रतिनिधीशी सुलभपणे संवाद साधू शकतात.

तंत्रज्ञान-सक्षम साधने नवीन फ्रॉड बस्टर्स


‘एआय’ व ‘एमएल’, तसेच ‘ब्लॉकचेन’अशा तंत्रज्ञानांमधील सुधारणांमुळे काही कंपन्यांना सिम्युलेशन्स, क्विझेस् व अपडेट्स अशी विविध साधने विकसित करण्यामध्ये फायदा झाला आहे. माहितीबाबत (संभाव्य फसवणूक व जोखीमांबाबत) ‘गेमिफिकेशन’ हे प्रबळ साधन आहे. ‘सिम्युलेशन्स’ गुंतवणूकदारांना फसवणूक करणार्‍यांची पद्धत आणि फसवणूक पद्धती ओळखण्यामध्ये मदत करतात.

घोटाळा-मुक्त संपत्ती निर्मितीसाठी व्यापार सुरक्षित करणे

सुधारित सुरक्षितता उपाय राबवत आणि नियमित ऑडिट्स करत सिस्टम पायाभूत सुविधेमध्ये सुधारणा करण्यासह ‘ब्रोकरेज’ कंपन्यांनी घोटाळेबाज आणि फसवणूक करणार्‍यांच्या एक पाऊल पुढे राहण्यासाठी प्रयत्न केला आहे. ‘ट्रेडिंग’ व्यासपीठामध्ये प्रबळ सुरक्षितता उपाय असण्यासोबत ते अपडेट असण्याची खात्री घेतल्याने गुंतवणूकदारांचे अनेक फसवणुकींपासून संरक्षण होऊ शकते. तसेच, वापरकर्त्यांना या सुरक्षितता वैशिष्ट्यांबाबत आणि त्यांचा प्रभावीपणे कसा वापर करावा, याबाबत माहिती देणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.

फसवणूक करणार्‍यांचे समूळ निर्मूलन करण्यासाठी प्रबळ रिपोर्टिंग

जोखीम व्यवस्थापन आणि ‘फ्रॉड-डिटेक्शन सिस्टम’ची क्षमता प्रबळ रिपोर्टिंग यंत्रणेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सुधारता येऊ शकते. ‘फिनटेक’ कंपन्यांनी ‘फ्रॉड रिपोर्टिंग’ची (फसवणूक केल्याबाबत माहितीचा रिपोर्ट) प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुलभ केली आहे. ‘ट्रेडिंग’ अ‍ॅपचा वापर करण्याव्यतिरिक्त सोशल मीडिया, व्हॉट्सअ‍ॅप आणि ‘एआय’-सक्षम ‘सीआरएम’च्या माध्यमातून कोणत्याही फसवणूक कृतींबाबत रिपोर्ट तयार करणे शक्य आहे. कोणतीही अनियमित किंवा संशयास्पद कृती ओळखणार्‍या व वापरकर्त्यांना त्याबाबत चेतावणी देणार्‍या अत्याधुनिक साधनांचा (जसे एमएल) अवलंब करत डाटा शेअरिंग व सहयोगाची प्रक्रिया सुधारता येऊ शकते आणि काही केसेसमध्ये स्वयंचलितदेखील करता येऊ शकते.

काही ‘ब्रोकरेज’ कंपन्यांनी व्यवहारांची पारदर्शकता व ‘ट्रेसेबिलिटी’ सुधारण्यासाठी ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाचादेखील वापर केला आहे. ‘ब्रोकरेज’ कंपन्यांनी अशा कोणत्याही फसवणूक प्रयत्नांना ओळखण्यासाठी व त्याबाबत रिपोर्ट देण्यासाठी नियामकांसोबत सहयोगाने अनुपालन प्रक्रिया सुधारत प्रतिसाद दिला आहे.

गुंतवणूकदारास अनुकूल ब्रोकिंग क्षेत्राची निर्मिती

नियामक, ब्रोकिंग कंपन्या आणि इतर भागधारकांनी व्यक्तींना फसवणुकीबाबत रिपोर्ट करण्याकरिता माध्यम उपलब्ध करून देण्यासाठी सहयोग केला पाहिजे. तसेच,‘एआय’-आधारित ‘फ्रॉड डिटेक्शन सिस्टम्स’ सारख्या प्रगत तंत्रज्ञान सोल्यूशन्सची अंमलबजावणी केल्यास फसवणूक करणार्‍या कृती ओळखण्यास व त्यावर प्रतिबंध ठेवण्यास मदत होऊ शकते. सहयोगाने आपण फसवणूक पद्धतींना सहजपणे ओळखता व त्यावर प्रतिबंध ठेवता येईल, असे भविष्य निर्माण करण्याप्रती काम करू शकतो, ज्यामधून सर्व गुंतवणूकदारांसाठी विश्वसनीय व सुरक्षित गुंतवणूक वातावरणाची खात्री मिळू शकते.



- प्रभाकर तिवारी

(लेखक ‘एंजल वन लिमिटेड’चे चीफ ग्रोथ ऑफिसर आहेत.)
 


 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121