"ज्ञानवापीला मशीद म्हणाल तर..."; योगी आदित्यनाथ यांचा सूचक इशारा

    31-Jul-2023
Total Views | 63
yogi 
 
लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वाराणसीतील ज्ञानवापी मशीद नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, यात त्रिशूलसह हिंदू धर्माची इतर चिन्हे आहेत. त्यामुळे या संकुलाला मशीद म्हणता येणार नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, “ज्ञानवापीमध्ये हिंदू देवी-देवतांच्या मुर्ती आहेत. ज्ञानवापीला मशीद म्हटले तर वाद होईल.
 
ते पुढे बोलतांना म्हणाले की, सरकारला ज्ञानवापी वादावर तोडगा काढायचा आहे. मुस्लिम समाजाने पुढे येऊन ही ऐतिहासिक चूक सुधारली पाहिजे. एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संवाद साधताना काशी विश्वनाथ मंदिर – ज्ञानवापी मशीद वादावर काही तोडगा निघेल का, असा प्रश्न विचारला होता. यावर मुख्यमंत्री योगी म्हणाले की, “जर आपण याला मशीद म्हटले तर वाद होईल. मला वाटते ज्याला देवाने दृष्टी दिली आहे, त्याने ते पहावे.
 
मुख्यमंत्री योगी म्हणाले, त्रिशूल मशीदीमध्ये काय करत आहे? आम्ही ते ठेवले आहे का? ज्योतिर्लिंग आहे, देवांच्या मूर्ती आहेत, अख्ख्या भिंती काय सांगत आहेत? मला वाटते की हा प्रस्ताव मुस्लिम समाजाकडून आला पाहिजे की आमची एक ऐतिहासिक चूक झाली आहे आणि आम्हाला त्या चुकीवर उपाय हवा आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121