केंद्राचा जुलैपर्यंत राज्यांना ३.९ लाख कोटींचा निधी

    26-Jul-2023
Total Views | 22
Pankaj Chaudhary
 
 
 
 
 केंद्राचा जुलैपर्यंत राज्यांना ३.९ लाख कोटींचा निधी
 
 
नवी दिल्ली  - केंद्र सरकारने जुलैपर्यंत १०.२१ कोटी रूपयांपैकी ३.०९ लाख कोटींचा निधी राज्यांना हस्तांतरित केला आहे असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.
 
"आर्थिक वर्ष २०२३-२०२४ साठी राज्यांना हस्तांतरित केलेल्या १०.२१ लाख कोटीं रूपयांपैकी ४ टप्यात ३.०९ कोटी वितरित केले आहेत.राज्यांना देण्यासाठी कोणतीही थकबाकी शिल्लक नाही."असे पंकज चौधरी यांनी लोकसभेत नमूद केले आहे.
 
'युनियन टॅक्स आणि ड्युटीज (केंद्रीय कर आणि शुल्क) यांच्या ३.९ कोटीचा निव्वळ उत्पन्नापैकी जीएसटीचे संकलन जुलै पर्यंत ९४,३६८ कोटी रूपये इतके होते.'
 
वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार संकलन केलेल्या निधीच्या भाग हा त्यांचा मंजुरीप्रमाणे राज्यांना वितरित केला जातो.सीजीएसटीची वितरित केलेली रक्कम आर्थिक वर्ष २०२२-२०२३ मध्ये २,६८,३३४.१९ कोटी रूपये इतकी होती.चार हप्त्यात ही रक्कम दिलेली आहे असे चौधरी म्हणाले."
 
१५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्राच्या विभाजित निधी वाटपासाठी राज्यांना ४१ टक्के रक्कम द्यावी असे निर्देशित केले होते.
अग्रलेख
जरुर वाचा
सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे १०० पर्यटन स्थळांवर साजरा केला जाणार आंतरराष्ट्रीय योग दिन!

सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे १०० पर्यटन स्थळांवर साजरा केला जाणार आंतरराष्ट्रीय योग दिन!

२१ जून २०२५ रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. देशभरातील १०० पर्यटन स्थळांवर योग दिन साजरा केला जाणार आहे. त्याचबरोबर ५० महत्वपूर्ण सांस्कृतिक स्थळांवर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे. आयुष मंत्रालयाद्वारे विशाखापट्टनम येथे साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121