उत्तर कोकणात पावसाचा जोर; खेड येथील जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी

    18-Jul-2023
Total Views | 52
Heavy Rainfall In Northern Kokan Region

रत्नागिरी
: राज्यात पावसाची धुवाधार बॅटिंग सुरु असून राज्यातील विविध भागात पावसाचा जोर दिसून आला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना पुर आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून रायगड जिल्ह्यातील दोन नद्यांनी देखील इशारा पातळी ओलांडली.

दरम्यान, उत्तर कोकणात पावसाचा जोर सकाळपासून कायम असून रायगड जिल्ह्यातील दोन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात खेड येथील जगबुडी मध्ये इशारा पातळी ओलांडून पुन्हा धोक्याच्या पातळीच्या जवळ आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. तसेच, सुरक्षेचा उपाय म्हणून चार दिवसांपूर्वीच रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF )टीम दाखल झाल्या आहेत.

दरम्यान, पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास खेड, पोलादपूर व महाड ही तिन्ही शहरे पुन्हा पुराच्या छायेत येण्याची शक्यता निर्माण झाली असून महाड, पोलादपूर तालुक्यातील व खेड तालुक्यातील नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121