पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग पुण्यातच राहणार; केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचा निर्णय

भाजप नेते विनय सहस्रबुद्धे यांचे विशेष प्रयत्न

    15-Jun-2023
Total Views | 65
Pune radio station news bulletins

नवी दिल्ली
: पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्याचा निर्णय रद्द करण्यात आला असून वृत्त विभागच पुण्यातच कार्यरत राहणार असल्याचा निर्णय केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने घेतला आहे. त्यासाठी भाजप नेते आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी विशेष प्रयत्न केले होते. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन सकाळी आणि सायंकाळी अशी एकूण चार बातमीपत्रे सादर केली जातात. अनेक वर्षांपासून सादर होणाऱ्या या बातमीपत्रांचा श्रोतावर्गही अतिशय मोठा आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने पुणे आकाशवाणीचा प्रादेशिक वृत्त विभाग छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रात विलीन करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्राच्या या निर्णयाविरोधात मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर उमटला होता.

याविषयी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. पुणे आकाशवाणीचा प्रादेशिक वृत्त विभाग पुण्यातच असणे आवश्यक असल्याचे डॉ. सहस्रबुद्धे यांनी यांनी केंद्रीय मंत्री ठाकूर यांना सांगितले होते. त्यानंतर गुरुवारी केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी वृत्त विभाग पुण्यातच राहिल, अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार, मंत्रालयाने निवेदन जारी करून पुढील आदेश येईपर्यंत पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग पुण्यातच कार्यरत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

बातमीपत्रे पुण्याहूनच सुरू राहणार – इंद्रजित बागल, केंद्र संचालक, पुणे आकाशवाणी

पुणे आकाशवाणी केंद्रावरुन दररोज सकाळी ७.१० वाजता आणि ८.३० वाजता मराठीमधून राष्ट्रीय बातमीपत्र दिले जाते. यासोबतच ८ वाजता, १०.५८ वाजता आणि ११.५८ वाजता दोन दोन मिनिटांचे बुलेटीन (एफएम हेडलाईन) चालविले जाते. पुढील आदेश होईपर्यंत ही बातमीपत्रे सुरु राहतील.

अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करणार - प्रकाश जावडेकर, खासदार आणि माजी माहिती व प्रसारण मंत्री

आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणार्‍या बातम्यांचे युनिट छत्रपती संभाजीनगर हलवण्याचा निर्णयाला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्थगिती दिली आहे. मी त्यांच्याशी संपर्क साधून या संदर्भात चर्चा केली होती. तसेच प्रसार भारतीचे अपूर्व चंद्र आणि मुख्य कार्यकारी अधिकारी द्विवेदी यांच्याशीही त्यांची चर्चा केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या बाबत स्वतंत्र सविस्तर चर्चा दिल्लीत गेल्यानंतर होईल.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे आभार – चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री, पुणे

आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन प्रक्षेपण होणारे प्रादेशिक बातमीपत्र बंद करु नये, यासाठी मी केंद्रीय केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहून विनंती केली होती. पुणेकर आणि लोकभावनेचा आदर करुन अनुराग ठाकूर यांनी आकाशवाणी पुणे केंद्राचे प्रादेशिक बातमीपत्र बंद करण्याच्या निर्णयास स्थगिती दिली. त्याबद्दल अनुराग ठाकूर यांचे मनापासून आभार. तसेच सर्व पुणेकरांचे अभिनंदन. आकाशवाणी पुणे केंद्राचे प्रादेशिक बातमीपत्र यापुढेही कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी लवकरच धोरणात्मक निर्णय होईल, असा मला विश्वास आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
वेदिका ब्राम्हण महिला मंडळ भीशीच्या माध्यमातून महिलांचे एकत्रीकरण

वेदिका ब्राम्हण महिला मंडळ भीशीच्या माध्यमातून महिलांचे एकत्रीकरण

भिशीचे फायदे अनेक असले, तरी भिशीच्या माध्यमातून महिलांचे एकत्रीकरण आणि त्याद्वारे पुढे सामाजिक कार्य उभे राहिल्याचे आपण क्वचितच ऐकले असेल. मनमाडमधील ‘वेदिका ब्राह्मण महिला मंडळ’ भिशीच्या माध्यमातून शेकडो महिलांना एकत्र करून सामाजिक आणि धार्मिक कार्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवत आहे. केवळ पैसा हे उद्दिष्ट न ठेवता, महिलांनी एकत्र येऊन सामाजिक, धार्मिक कार्यात सहभागी व्हावे, तसेच एकमेकांशी संवाद वाढावा, हे या मंडळाचे उद्दिष्ट आहे. जाणून घेऊया, मनमाडमधील नोंदणी नसतानाही सर्वदूर प्रसिद्धीस पावलेल्या या अनोख्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121