हिंदू मंदिरांवर हल्ले करणाऱ्यांवर कारवाई करा : नरेंद्र मोदी

    24-May-2023
Total Views | 96
Narendra Modi on temple-attacks


नवी दिल्ली
: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियात मंदिरावर होणाऱ्या हल्ल्यांबाबत भाष्य केले आहे. ऑस्ट्रेलियात मंदिरावर हल्ले झाले.हल्ले करणाऱ्या लोकांना भारत आणि ऑस्ट्रेलियात असणारे संबध बिघडवायचे आहेत.पण त्यांना तसे करण्याचा कुठलाच अधिकार नाही. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे चांगले काम करत आहेत.त्यामुळे मंदिरावर हल्ले करणाऱ्या लोकांवर ते कारवाई करतील , असे मोदी म्हणाले.

दरम्यान मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे. तसेच द्वीपक्षाय बैठक सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिडनी येथे अॅडमिरल्टी हाऊसमध्ये औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.दरम्यान, यावेळी बंगळुरूतील नवीन ऑस्ट्रेलियन कौन्सुलेट जनरलच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. यामुळे भारतातील ऑस्ट्रेलियन डिजिटल आणि इनोव्हेशन इकोसिस्टमशी जोडण्यास मदत होणार आहे. तसेच भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संबंधाचा फायदा ग्लोबल साऊथच्या प्रगतीसाठीही होईल, अशी आशा मोदींनी व्यक्त केली.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121