मुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॅाप्टरचे इमर्जन्सी लँडिंग!

    13-May-2023
Total Views | 122
cm-eknath-shinde-s-helicopter-emergency-landing-on-raj-bhavan

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅडिग करण्यात आले आहे. शिंदे दि. १३ मे रोजी सातारा आणि पाटण दौऱ्यावर जात होते. त्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.याआधी ही बुलढाण्याला जात असताना मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला होता. मात्र ज्यावेळी ही घटना घडली होती .तेव्हा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये नव्हते. पंरतू दि. १३ मे रोजी घडलेल्या घटनेत हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत आणि रोहियो मंत्री संदिपान भूमरे हेलिकॅप्टरमध्ये होते.

हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने हेलिकॅाप्टरचे राजभवन हेलिपॅडवर इमर्जन्सी लॅंडिग केले गेले. हेलिकॅाप्टरच्या ए सी मध्ये बिघाड झाल्यामुळे बंद पडला आणि त्यामुळे हेलिकॅाप्टर पुन्हा राजभवनच्या हेलिपॅडवर उतरविण्यात आले.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121