झाडांच्या मनात जाऊ..!

    28-Apr-2023
Total Views |
 

Plants Make Noises
 
 
झाडे तणावाच्या वेळी आवाज करतात, त्यांना वेदनाही जाणवते आणि वेदनांमध्ये ते किंचाळतात सुद्धा! इस्रायलमध्ये नुकत्याच झालेल्या या संशोधनात शास्त्रज्ञांनी वरील बाबी प्रयोगाअंती सिद्ध केल्या आहेत. यानिमित्ताने शालेय अभ्यासक्रमात असलेल्या कवी नलेश पाटील यांच्या ‘झाडांच्या मनात जाऊ..!’ या कवितेची पुन्हा एकदा आठवण झाली.
 
हिंदू परंपरा आणि संस्कृतीत झाडांना अनन्यसाधारण महत्त्व. अंगणातील तुळशीपासून ते अगदी वटवृक्षापर्यंत आजही आपण पूजाअर्चा करतो. तसेच,झाडांसाठी 1730 साली राजस्थानातल्या बिश्नोेर्ई समाजातील लोकांनी केलेले प्राणांचे बलिदानहीदिले. या बलिदानातून प्रेरणा घेऊन 1973 साली अशीच एक मोठी चळवळ उभी राहिली, जी जगभर ‘चिपको आंदोलन’म्हणून गाजली. याच पाश्वर्र्भूमीवर झाडांचे महत्त्व लक्षात घेत जगप्रसिद्ध ‘सेल जर्नल’मध्ये नुकतेच एक संशोधन प्रकाशित झाले आहे. या संशोधनात, इस्रायलमधील 30 संशोधकांनी असा निष्कर्ष समोर आणला आहे की, तणावाखाली असलेल्या वनस्पती एक विशेष ध्वनी उत्सर्जित करतात. हा अल्ट्रासोनिक ध्वनी बुडबुडासारख्या आकाराचा असून, तो झाडांच्या रडण्याच्या, वेदनेचा आवाज असल्याचे शास्त्रज्ञांना हे निरीक्षण नोंदविले आहे. विशेषतः टोमॅटो आणि तंबाखूच्या वनस्पतींमध्ये हे निरीक्षण अधिक प्रमाणात नोंदवले गेले आहे. तो आवाज नागरिकांना ऐकू येत नाहीत. ही बाब वेगळी.
 
याबाबत खरंतर भारतीय संशोधक जगदीशचंद्र बोस यांनीदेखील वनस्पतींना भावना असतात, हा सिद्धांत सर्वप्रथम मांडला होता.सुरुवातीला ‘रॉयल सोसायटी’ने त्यांचे हे संशोधन प्रसिद्ध करण्यास नकार दिला होता. ज्यावेळी हे लेखन त्यांनी पुस्तकरूपात प्रसिद्ध केले आणि ते लोकप्रिय ठरू लागले,तेव्हा ‘रॉयल सोसायटी’ने त्याची दखल घेतली आणि प्रसिद्धदेखील केले.
 
या संशोधनावर इस्रायलमधील तेल अवीव विद्यापीठातील उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ लिलाच हदानी म्हणतात की, “तणावामध्ये असणार्‍या वनस्पतींमध्ये दृश्य, रासायनिक आणि स्पर्शज्ञानाने समजतील असे बदल होतात. त्यांच्या पानांचा रंगदेखील बदलतो. तसेच, काही वनस्पतींची पाने ताठ दिसत असली, तरी त्यांना स्पर्श केल्यास मऊपणा आल्याचे लक्षात येते. या त्यांच्यातील बदलांचे आकलन त्यांच्याभोवती असणार्‍या समस्त जीवसृष्टीला होते.” मात्र, त्यांच्या वेदना ज्या आवाजात बाहेर पडतात, त्याबाबत आजवर संशोधन झालेले नसल्याचेही हदानी सांगतात. हा आवाज वनस्पतींच्या खोडातील पाणी वाहून नेणार्‍या भागातूनबाहेर पडतो. त्या ठिकाणी पाणी कमी मिळाल्यामुळे हवेचे बुडबुडे तयार होतात. त्यामुळे तो भाग फुगतो आणि त्यापासून हा आवाज येत असल्याचे हे संशोधन सांगते. एवढेच नव्हे, तर वनस्पतींचा हा आवाज काही मीटर दूरवर ऐकायला येतो. तसेच, वनस्पतींना जगण्यासाठी आवश्यक घटकांची कमतरता झाल्यासही आवाज येतो. मुख्यत्वे झाडं तोडतानाही असा आवाजयेतो, असेही या संशोधनात नमूद करण्यात आले आहे.
 
हिंदू परंपरेतील रूढी, प्रथा, परंपरा, सण साजरे करण्यामागे शास्त्रीय विचार आढळतो. मात्र, त्याची मांडणी वैज्ञानिक पातळीवर अधोरेखित झालेली नव्हती. त्यामुळे अनेक लोक अंधश्रद्धा म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात. विज्ञानाच्या कसोटीवर जगदीशचंद्र बोस यांच्या संशोधनाची दखल घेत हा प्रवास पुढेही सुरूच राहणार आहे.
 
जागतिकीकरणाच्या युगात मानवी हव्यासापोटी एकीकडे पर्यावरणाचा र्‍हास होत असताना, या प्रकारचे संशोधन मानवासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. झाडे आपण आजही मोठ्या प्रमाणात लावतो. मात्र, त्यांची काळजी, त्यांची निगा बहुतांश वेळा घेतली जात नाही. औद्योगिकीकरणाच्या सपाट्यात मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जात आहे. झाडांच्या विश्वातूनच मानवाचा विकास होणार आहे. त्यासाठी झाडे लावताना त्यांना जगवण्याचा विचार प्रथम व्हायला हवा. तोडताना या झाडांनाही माणसांप्रमाणेच सजीव भावना आहेत, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
 
 
- अमित यादव
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121