राज ठाकरे भावी मुख्यमंत्री?

    22-Mar-2023
Total Views | 93
mns-chief-raj-thackeray future Chief Minister


मुंबई
: गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क परिसरात दि.२२ मार्च रोजी मनसेचा पाडवा मेळावा पार पडणार आहे. त्यानिमित्त शिवाजी पार्क परिसरात मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्या बॅनरबाजीत महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे अशा आशयाचा मजकूर छापण्यात आला आहे. तसेच शिवसेना भवनासमोर बॅनर लावून मनसेने ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे ह्या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे.
 

mns-chief-raj-thackeray future Chief Minister 


दरम्यान राज ठाकरेंची शिवाजी पार्कवर सभा होणार असल्याने या संपुर्ण प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया ही तितकीच महत्तवाची ठरणार आहे. या मेळाव्याचा टीझर ही जारी करण्यात आला होता. याआधी ९ मार्च रोजी मनसेच्या वर्धापनदिनी झालेल्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी सविस्तर राजकीय भाष्य करणं टाळलं होतं.तसेच मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याबद्दल गेल्यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले होते की, कोणाचे वाभाडे काढायचे, कोणावर काय बोलायचं हे, हे सगळं मी गुढीपाडव्याच्या सभेत बोलणार. त्यामुळे आजच्या सभेत राज ठाकरे कोणत्या विषयाला हात घालतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121