गळ्यात पाटी अन्... गाईंची तस्करी करणाऱ्या मोहम्मद आलमने केले आत्मसमर्पण!
म्हणाला- "योगी बाबा माझे रक्षण करा, मी पुन्हा कधीच गोहत्या करणार नाही"
18-Dec-2023
Total Views | 63
नवी दिल्ली : बदाऊनमध्ये एका गाय तस्कराने गळ्यात फलक घेऊन पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. गाय तस्कर मोहम्मद आलम आपल्या संरक्षणाची याचना करत पोलीस ठाण्यात पोहोचला होता. गोहत्या प्रकरणात तो आरोपी होता.नाव आणि पत्त्यासह आत्मसमर्पण करण्यासाठी पोलिस ठाण्यात पोहोचलेल्या या गाय तस्कराचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद आलम हा बदाऊनच्या सहसवान पोलीस ठाण्याच्या काहिरपूर खैराती गावात राहणारा असून तो गोहत्येच्या अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे. गोहत्येच्या घटनांबाबत त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. अलीकडेच पोलिसांनी गुंड आलमवर कारवाई केली होती.
आलमवर गुन्हा दाखल होताच तो फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलिस सातत्याने छापे टाकत होते. कठोर कायदेशीर कारवाईच्या भीतीने, त्याने दि.१८ डिसेंबर २०२३ रोजी बदाऊनमधील हाजा पोलिस स्टेशन गाठले आणि आत्मसमर्पण केले.गळ्यात फलक घेऊन आलम पोहोचला होता. या फलकावर लिहिले होते, “मी, मोहम्मद आलम, नूर मोहम्मद यांचा मुलगा, खैरपूर खैराटी पोलिस स्टेशन, सहस्वान, बदायुन गुंड प्रकरणात पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत आहे. आता मी कधीही गायींची कत्तल करणार नाही, योगीबाबा कृपया माझे रक्षण करा."
आलमवर यापूर्वी सहापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या टोळीत ५ लोक होते जे गोवंश तस्करी आणि गोहत्या करायचे, त्यापैकी ४ जणांना पोलिसांनी अटक करून कारागृहात पाठवले आहे. आलम फरार झाल्यानंतर त्याच्या घरासह इतर ठिकाणी छापे टाकले असता त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. पोलीस आता आलमला न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करणार आहेत.
अलीकडच्या काळात उत्तर प्रदेशात गोवंश तस्करांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांशी झालेल्या चकमकीत काही गुरे तस्कर जखमी झाले आहेत तर अनेकांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईच्या भीतीने आलमने आत्मसमर्पण केले आहे.