वारंवार याचिका दाखल करणाऱ्या संजीव भट्टला ३ लाखांचा दंड

    03-Oct-2023
Total Views | 846

sanjeev bhatt

नवी दिल्ली :
माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यास अंमली पदार्थविषयक प्रकरणात वारंवार याचिका दाखल केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यास अंमली पदार्थ प्लांटींग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने जप्ती प्रकरणाबाबत संजीव भट्ट याच्या तीन याचिकांवर प्रत्येकी एक लाख रुपये (एकूण तीन लाख) दंड ठोठावला आहे. संजीव भट्ट याने भेदभावाचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात तीन नवीन अर्ज दाखल केले होते. सर्वोच्च न्यायालयाने तीन प्रकरणांसाठी प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावत या याचिका फेटाळून लावल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने संजीव भट्ट याच्यावर कठोर ताशेरेही ओढले. न्यायालयाने म्हटले की, याप्रकरणी तुम्ही किमान एक डझनवेळा न्यायालयात आला आहात. गतवेळी न्या. भुषण गवई यांनी दया दाखवून केवळ १० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र, न्यायालयाने तुमच्यासाठी विशेष आदेश काढावा अशी आपली इच्छा दिसते. त्यामुळे यावेळी एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्या येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121