पेटीएमने आपले पंख विस्तारले. पेटीएम सीईओ यांच्याकडून VSS Investments Fund ची घोषणा
नवी दिल्ली: देशातील आघाडीची डिजिटल पेमेंट वाँलेट कंपनी पेटीएमने आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करण्याबरोबरच भारतीय स्टार्टअपला बळ देण्यासाठी वेगळ्या निधीची तरतूद करण्याचे ठरवले आहे. पेटीएमचे मुख्य कार्यकारी संचालक विजय शर्मा यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स व इलेक्ट्रिक वाहन व्यवसायाला प्राधान्य देण्यासाठी ही नवी गुंतवणूक केली जाऊ शकते. कॅटेगरी २ च्या Alternate Investments Funds ची निर्मिती कंपनी करणार आहे.या निधीची एकूण किंमत २० कोटींच्या घरात असणार आहे.
मिडिया जाहीरनाम्यात 'भारतीय स्टार्टअप इकोसिस्टीम व भावी गुणवंत व्यवसायिकांना बळ देण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. भारताला आधुनिक तंत्रज्ञान व आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे हब बनवण्यासाठी हा निधी उपक्रम असणार आहे.' असे म्हटले गेले आहे.
याआधीही शर्मा यांनी अनेक स्टार्टअपला पाठिंबा दिला होता