IMPS युजर्ससाठी आनंदाची बातमी
नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपल्या नियमावलीत बदल केला आहे. डिजिटल ट्रान्सफॉर्मैशनचा युगात धोरणात्मक बदल करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. ' डिजिटल इंडिया ' च्या उपक्रमाअंतर्गत पैसे ट्रान्स्फर करताना नवीन पाऊल NPCI टाकत आहे. बँकेत जाऊन लाईनीत पैसे काढण्याचे दिवस जाऊन आता डिजिटल ' शिफ्ट ' आला आहे. याचाच पुढील भाग म्हणून IMPS (Immediate Payment Services) म्हणून ओळखले जाते. IMPS हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे.
बेनिफिशरी ( लाभार्थी) चे नाव न टाकताही पाच लाखांपर्यंतची रक्कम ट्रान्स्फर करता येतात.आता नवीन तरतूदीनुसार IMPS युजरला फक्त मोबाईल नंबरवर पैसे पाठवणे शक्य होणार आहे. लाभार्थ्यांचे फक्त नाव मोबाईल नंबर यावर व्यवहार करता येईल.
IMPS काय आहे?
IMPS ( Immediate Payment Services) ही प्रणाली National Payments Corporation of India ने डेव्हलप केले आहे. ही प्रणाली सुलभ व्यवहारांकरिता उपयुक्त ठरते.मोबाईल व इंटरनेट बँकिंग दोन्हींमध्ये यांचा वापर होतो. २४ तासात कधीही यात व्यवहार करता येतो. सुट्टीच्या दिवशीही या सुविधेचा लाभ घेता येतो. व्यवसायाच्या तुलनेत २.५ ते २५ रूपये फी बँक आकारते.