
मानसिक आजार व भीती जर नाहीशी करायची असेल, तर होमियोपॅथीच्या औषधांना पर्याय नाही. कारण, होमियोपॅथीची औषधे नुसत्या हाडामांसाने बनलेल्या माणसावर कार्य करत नाहीत, तर हाडामांसाच्या आणि पेशींना कार्यरत ठेवणारी जी चैतन्यशक्ती आहे, तिच्यावर कार्य करते. माणसाचे मन, भावना, इच्छाशक्ती, विवेकबुद्धी व अंतर्मन यावर सकारात्मक कार्य करते. मन नावाचा कुठलाही अवयव मानवी शरीरात नसतो. मनाचे, इच्छाशक्तीचे (विलपॉवर), भावनांचे, विवेकबुद्धीचे कुठलेही ठोस शारीरिक दृश्य अस्तित्त्व माणसाच्या शरीरात नसते आणि तरीसुद्धा या सर्व गोष्टी अस्तित्वात असतात. जसे वारा दिसत नाही, पण त्याचे अस्तित्व असते. यालाच म्हणतात, ‘डायनॅमिक लेव्हल.’ शरीरातील ऊर्जा, चैतन्यशक्ती हीसुद्धा दिसत नाही. परंतु, त्याच्याशिवाय मनुष्य जीवंतच राहू शकत नाही. यालाच ‘डायनॅमिझम’ असे म्हणतात. शरीरातील सर्व अवयवांचे कार्य एक-दुसर्यावर अवलंबून असते, तसेच त्यांचे ‘सायक्रोनायझेशन’ म्हणजेच त्यांच्यातील सुसूत्रता कशामुळे असते, तर न दिसणार्या परंतु अस्तित्वात असणार्या चैतन्यशक्तीमुळे. हीच चेतनशक्ती संपूर्ण शरीरातील अवयवांच्या कार्यामध्ये सुसूत्रता आणते. याच शक्तीमुळे नियोजनबद्धरित्या सर्व अवयव कार्य करत असतात. हृदय, फुप्फुसे, यकृत, मूत्रपिंड तसेच मेंदू याच अंतर्गत चैतन्यशक्तीमुळे नियोजनबद्ध काम करत असतात. म्हणजेच काय, तर ही चैतन्यशक्ती जर खालावली, तर आपोआप या सर्व अवयवांचे कार्य व नियोजन बिघडते. त्याचबरोबर मनाचेही विचार बिघडतात. आता असे बघा की, जर एखादी अतिसूक्ष्म गोष्ट असेल, तर तिला सूक्ष्मातच जाऊन शोधावे लागते. ‘डायनॅमिक’ ऊर्जेला तसेच ‘डायनॅमिक’ असलेल्या मनाला जर सूक्ष्मात जाऊन बरे करायचे असेल, तर त्यासाठी सूक्ष्म आणि ‘डायनॅमिक’ औषधांचीच गरज असते. ‘Dynamic diseases can only be curable with Dynamic medicines’
आता ‘डायनॅमिक मेडिसीन’ म्हणजे काय ते पाहू. उदाहरणार्थ, आपण अणुबॉम्बचे उदाहरण पाहू. अणुबॉम्बच्या प्रत्येक अणूमध्ये इतकी प्रचंड ऊर्जा सामावलेली असते की, त्या बॉम्बच्या आकारापेक्षा हजारोपट आकारमानाच्या जमिनीला तो उद्ध्वस्त करू शकतो, तसेच एखाद्या अणूमध्ये साठवलेली ऊर्जा (अॅटोमिक एनर्जी) फार उपयुक्त गोष्टीसाठी व देशाच्या विकासासाठी वापरता येते. ही ऊर्जा असते, ती दिसत नाही. परंतु, ती असते. मात्र, त्याचप्रमाणे होमियोपॅथीची एक छोटीशी गोळी ही अणूप्रमाणे असते. त्यात प्रचंड ऊर्जा साठवलेली असते. कारण, होमियोपॅथीची औषधे घळपशींळल शपशीसू (केनेटीक एनर्जी, गतिज ऊर्जेचे)चे ‘डायनॅमिक एनर्जी’मध्ये रूपांतर करून बनवलेली असतात. त्यालाच ‘ड्रग डायनॅमायझेशन’ असे म्हणतात. म्हणूनच ‘डायनॅमिक’ आजाराला फक्त ‘डायनॅमिक ऊर्जा’ असलेली औषधेच बरे करू शकतात. यामुळेच असे दिसून येते की, जे आजार इतर औषध प्रणालीमध्ये बरे होत नाहीत, ते होमियोपॅथीमुळे बरे होतात. कारण, होमियोपॅथीचीच औषधे या पातळीवर कार्य करत असतात. यापुढेही आपण मानसिक आजारापासून कसे सकारात्मकतेने बाहेर यायचे, याचे उपाय पाहूया...
डॉ. मंदार पाटकर
(एमडी होमियोपॅथी)
९८६९०६२२७६