"थर्टी फर्स्ट पार्टी करणं हे निर्लज्जतेचे उदाहरण!" : रझा अकादमी अध्यक्षांचे वक्तव्य!

    31-Dec-2022
Total Views | 50
सईद नूरी



नवी दिल्ली :
मुस्लीमांनी नवं वर्ष साजरं करण हराम आहे, त्याऐवजी रात्री अजान, कुराण तिलाबत आणि मेहफिल-ए मिलाद (धार्मिक कार्यक्रम) ) आयोजित करा, असे आवाहन रझा अकादमी तर्फे करण्यात आले आहे. रझा अकादमीचे अध्यक्ष सईद नूरी यांनी दि. ३० डिंसेबर एक व्हीडिओ ट्विट करत मुस्लीमांनी नवं वर्ष साजरे करणे हे हराम आहे असल्याचे म्हटले आहे. त्या व्हीडिओमध्ये सईद नूरी यांनी ३१ डिंसेबरला नवे वर्ष साजरे न करण्याचे आव्हान मुस्लीमांना केले आहे. तसेच नूरी यांनी ३१ डिंसेबर रोजी रात्रभर मशीदी खुल्या ठेवण्याची मागणी केली आहे.


रझा अकादमी या मुस्लिम संघटनेने मुस्लिम तरुणांना ३१ डिसेंबरला पार्टीमध्ये जाणे टाळावे, असे सांगितले आहे. सईद नूरी म्हणाले की, दुर्दैवाने वर्षातील शेवटची रात्र, ज्याला लोक थर्टी फस्ट नाईट म्हणतात, हे म्हणणे निर्लज्जतेचे उदाहरण आहे. सेलिब्रेशनच्या नावाखाली अशा पार्टीमध्ये घृणास्पद कृत्य केले जातात, अशा वाईट कृत्यांमुळे सैतानालाही लाज वाटू शकते, असे ही नूरी म्हणाले. तसेच अशी बेकायदा आणि हराम कामे करण्यात सर्व जाती-धर्माचे आणि वयोगटाचे लोक सामील असतात.

 
ते पुढे म्हणाले, "आमच्या मुस्लिम तरुणांना अशा गैर-मूर्ख 'हराम' क्रियाकलापांमध्ये विशेष रस आहे. अजूनही वेळ आहे, आपण आमच्या मुलांना अशा निर्लज्जपणापासून रोखले पाहिजे आणि त्यांना अशा पार्टीमध्ये जाण्यापासून रोखले पाहिजे.' असे वक्तव्य ही नूरी यांनी केले. रझा अकादमी हा भारतीय सुन्नी मुस्लिमांचा सुन्नी बरेलवी गट आहे जो लिखाण, प्रकाशन, संशोधन आणि अभ्यासाद्वारे इस्लामिक सिद्धांताला पुढे करतो. तसेच रझा अकादमीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, '३१ डिसेंबर रोजी अजान, कुराण तिलाबत आणि मेहफिल-ए मिलाद (धार्मिक कार्यक्रम) ) आयोजित केले पाहिजे.






अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121