महाएमटीबी इम्पॅक्ट : ठप्प झालेले माहीममधील लसीकरण केंद्र पूर्ववत

    10-Apr-2021
Total Views |

माहीम _1  H x W



मुंबई :
अनेक भागातील लसीकरण केंद्रावर लसीकरण बंदचे फलक लागल्याने सर्वसामान्य नागरिकांना, कोरोना योध्यांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. जी-उत्तर विभागातील माहीमच्या लेफ्ट गुप्ते मार्गावरील हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आलेल्या लसीकरण केंद्रावरही असाच गोंधळ उडाला असल्याचे वृत्त काल महाएमटीबीने दिले होते. त्यानंतर आता मुंबई महानगरपालिका प्रशासनाला जाग आली आहे.



आज दिनांक १० रोजी हे जी-उत्तर विभागातील माहीमच्या लेफ्ट गुप्ते मार्गावरील हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आलेल्या लसीकरण केंद्रावर काल लसीकरण बंद असल्याचे फलक लावण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. मात्र आज महापालिकेने या केंद्रावर लसपूरवठा केला असून हे केंद्र पुन्हा सुरु झाले. त्यामुळे आज पुन्हा लसीकरण सुरु झाल्याने नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद याठिकाणी पाहायला मिळाला.


मुंबईतील लसीकरण व्यवस्थापन कोलमडले कुठे ?

जेव्हा मुंबईचा विचार करतो तेव्हा लोकसंख्येचा विचार का केला गेला नाही. मुंबईतल्या निवडणूकांवेळी मात्र, प्रत्येक मतदार संघात पोहोचण्याची तयारी का केली नाही, असा प्रश्न इथले नागरिक विचारत आहेत. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पळ, लक्ष्मीकांत साटम, दिलीप शिरसाट, राजेश पवार यांनी देखील लोकांना झालेल्या त्रासाबद्दल नाराजी व्यक्त केली. सरकारी रुग्णालयात लस नाही व खाजगी रुग्णालयात लस उपलब्ध आहे. ह्याकडे लक्ष केंद्रीत करून जर लसीकरणावर राजकारण होत असेल तर ते कृपया थांबवा, अशी विनंती केली आहे. आजपर्यंत किती लस केंद्र सरकारकडून देण्यात आली त्याची आकडेवारी जाहीर करावी अशी मागणी केली आहे.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121