‘टर्म इन्शुरन्स पॉलिसी’ घेताना टाळावयाच्या चुका...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2021   
Total Views |

eco _1  H x W:



‘टर्म इन्शुरन्स’ विशेषत: घरातील कर्त्या पुरुषाने उतरवावा. ही ‘इन्शुरन्स पॉलिसी’ घेण्यामागचा मुख्य उद्देश हा असतो की, जर कर्ता पुरुष मृत्यू पावला, तर त्याच्या कुटुंबाचे आर्थिक व्यवहार व्यवस्थित चालायला हवेत. जर विम्याच्या दाव्यातून मिळणारी रक्कम कुटुंबाच्या प्राथमिक गरजा भागवू शकत नसेल, तर त्याचा उपयोग काय, म्हणून कमी रकमेचा विमा उतरविण्याची चूक करू नका. घरच्या कर्त्या पुरुषाने दुर्दैवाने तो जीवंत राहू शकला नाही, तर त्याच्या कुटुंबाच्या भविष्यातील सर्व गरजांचा विचार करून ‘टर्म इन्शुरन्स पॉलिसी’ उतरवायला हवी. भविष्याचा विचार न करता अंदाजे काहीतरी रकमेचा ‘टर्म इन्शुरन्स’ घेऊ नका. विमा उतरविताना विम्याची गरज, भविष्यातील अपेक्षित चलनवाढ, भविष्यातील आतापासून दिसणारे खर्च, भविष्यात अचानक उद्भवणारे खर्च, या सर्व बाबींचा विचार करून विमा उतरविण्याची रक्कम ठरवावी.

 




वित्तीय नियोजन करताना कोणालाही भविष्यात अचानक किती खर्च उभे राहतील किंवा कशा कशावर खर्च करावा लागेल, याचा पूर्ण अंदाज येऊ शकत नाही. पण, तरीही वित्तीय नियोजन हे करावयास हवे, याबाबतचे पहिले पाऊल म्हणजे ‘टर्म इन्शुरन्स पॉलिसी’ घ्यावयास हवी. ही ‘पॉलिसी’ जर तुम्ही उतरविली असेल, तर तुमच्या कुटुंबाला संरक्षण मिळू शकते व मृत्यूनंतर पैसा मिळू शकतो. ‘टर्म इन्शुरन्स पॉलिसी’ काढताना, अनवधानाने बर्‍याच चुका होऊ शकतात. त्या टाळल्या तर या पॉलिसीतून जास्तीत जास्त फायदे मिळू शकतील.

 



 

गरजेपेक्षा कमी रकमेचा विमा उतरविणे

‘टर्म इन्शुरन्स’ विशेषत: घरातील कर्त्या पुरुषाने उतरवावा. ही ‘इन्शुरन्स पॉलिसी’ घेण्यामागचा मुख्य उद्देश हा असतो की, जर कर्ता पुरुष मृत्यू पावला, तर त्याच्या कुटुंबाचे आर्थिक व्यवहार व्यवस्थित चालायला हवेत. जर विम्याच्या दाव्यातून मिळणारीरक्कम कुटुंबाच्या प्राथमिक गरजा भागवू शकत नसेल, तर त्याचा उपयोग काय, म्हणून कमी रकमेचा विमा उतरविण्याची चूक करू नका. घरच्या कर्त्या पुरुषाने दुर्दैवाने तो जीवंत राहू शकला नाही, तर त्याच्या कुटुंबाच्या भविष्यातील सर्व गरजांचा विचार करून ‘टर्म इन्शुरन्स पॉलिसी’ उतरवायला हवी. भविष्याचा विचार न करता अंदाजे काहीतरी रकमेचा ‘टर्म इन्शुरन्स’ घेऊ नका. विमा उतरविताना विम्याची गरज, भविष्यातील अपेक्षित चलनवाढ, भविष्यातील आतापासून दिसणारे खर्च, भविष्यात अचानकउद्भवणारे खर्च, या सर्व बाबींचा विचार करून विमा उतरविण्याची रक्कम ठरवावी.


 

प्रीमियम

जीवन विमा असो की, वैयक्तिक अपघात विमा असो, तसेच आरोग्य विमा असो किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या विमा असो, तो उतरविण्यासाठी ‘प्रीमियम’ मूल्य भरावेच लागते. या क्षेत्रातील जाणकारांच्या मते कोणतीही ‘पॉलिसी’ निवडताना किंवा उतरविताना, किती ‘प्रीमियम’ भरावा लागणार, या एकाच गोष्टीला तुम्ही महत्त्व देऊ नये, दावा संमत होण्याचा ‘रेशो’ एखाद्याच्या गरजेनुसार ‘पॉलिसी’ योग्य आहे का? विमा कंपनीची पत व आर्थिक पाया यांचा विचार करावा. मृत्यूनंतर दाव्याची प्रक्रिया सुरु असताना याबाबींचे महत्त्व लक्षात येते.



 

विमा उतरविण्यास उशीर करू नये

 

जेव्हा कोणीही ‘टर्म इन्शुरन्स पॉलिसी’ योजनेत गुंतवणूक करतो, तेव्हा मृत्यू आल्यास संरक्षण मिळावे, हा त्यामागचा हेतू असतो. मृत्यू कधी कोणाला येईल, हे काही सांगता येत नाही. जीवन हे अनिश्चित आहे व कोरोनामुळे ते जास्त अनिश्चित झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर ‘टर्म इन्शुरन्स पॉलिसी’ उतरावी. वय वाढू देऊ नये. कमी वय असतानाच ‘पॉलिसी’ काढावी. जर वय वाढले, तर मृत्यूची जोखीम वाढते आणि विमा उद्योगाच्या नियमनानुसार, जास्त जोखीम तर जास्त प्रीमियम भरावा लागतो. त्यामुळे कमी वय असताना ‘पॉलिसी’ घेऊन प्रीमियम कमी भरावा, २५ व्या वर्षी जर ५० लाख रुपयांची ‘टर्म इन्शुरन्स पॉलिसी’ उतरविली, तर वर्षाला पाच हजार रु. ‘प्रीमियम’ भरावा लागतो. जर ‘पॉलिसी’ ५० लाख रुपयांची 35व्या वर्षी उतरविली, तर वर्षाला नऊ हजार रुपये ‘प्रीमियम’ भरावा लागतो. त्यामुळे ही ‘पॉलिसी’ उतरविताना वय वाढू देण्याची चूक करू नका. या ‘पॉलिसी’च्या ‘प्रीमियम’ दरवर्षी भरावा लागतो. म्हणजे, तुम्हाला वाढीव ‘प्रीमियम’ दरवर्षी भरावा लागणार.



 

चुकीची माहिती देऊ नका

‘फॉर्म’ भरताना (‘ऑनलाईन’ किंवा ‘ऑफलाईन’) चुकीची माहिती देऊ नका किंवा कुठलीही माहिती लपवू नका. विशेषत: तुमची आरोग्यविषयक माहिती म्हणजे तुमचा वैयक्तिक इतिहास, तुमचा आर्थिक दर्जा म्हणजे तुमचे उत्पन्न. ही महत्त्वाची माहिती खोटी दिली, तर याचा परिणाम ‘पॉलिसी’च्या ‘अंडररायटिंग’वर तसेच दावा संमत करताना होऊ शकतो आणि माहिती खोटी देणे, यात विमाधारकाचेच नुकसान होऊ शकते. तुम्हाला ‘पॉलिसी’ उतरविताना काही आजार असतील म्हणजे सर्दी, खोकला, साधा ताप वगैरे नव्हेत, तर गंभीर स्वरुपाचे, तर तुमची जीवन जगण्याची पद्धती, तुम्ही धुम्रपान करणारे असाल, मद्यपान करणारे असाल, तर तुमची ‘प्रीमियम’ची रक्कम वाढणार. तो ‘वाढीव प्रीमियम’ भरा, पण खोटी माहिती देऊ नका. जर दावा संमत करण्याची वेळ आली, तर अडचणी निर्माण होऊ शकतील. समजा, एखाद्याला दुर्धर आजार आहे, हृदयरोग आहे, त्याने ‘पॉलिसी’ उतरविताना या आजाराची माहिती लपवून ठेवली व त्याचा मृत्यू जर हृदयरोगाने झाला, तर अशा प्रकरणात, विम्याचा दावा नामंजूर होऊ शकतो. ‘पॉलिसी’ उतरविताना एक चूक लपविल्यामुळे, कुटुंबाचे लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते, हे पक्के ध्यानात ठेवा.


 

वैद्यकीय तपासणीशिवाय मिळणार्‍या ‘पॉलिसी’चा पर्याय निवडू नका

ही फार मोठी चूक ठरू शकते. वैद्यकीय तपासणीमुळे या कंपनीकडे तुमच्या आरोग्याचा खरा व पूर्ण तपशील उपलब्ध असतो. त्यामुळे दावा संमत करतेवेळी विमा कंपनीकडे आरोग्याविषयी काही माहिती किंवा पूर्ण माहिती लपविलीत तर तुम्ही दावा करू शकणार नाही. विमा कंपनीने जर तुमची आरोग्य तपासणी केली असेल, तर विमा कंपनीकडे थेट तुमचे ‘रिपोर्ट’ जाणार. तुमच्या ‘रेकॉर्ड’साठी सर्व आरोग्य तपासणींच्या ‘रिपोर्ट’च्या ‘कॉपी’ मागून घेऊन, तुमच्याजवळ ठेवा, याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो.



 

प्राप्तिकर वाचविण्यासाठी ‘पॉलिसी’

प्राप्तिकर कायद्याच्या ‘कलम 80 सी’ अंतर्गत विमा ‘पॉलिसीं’वर भरलेल्या दीड लाख रुपयांपर्यंतच्या ‘प्रीमियम’वर कर सवलत मिळते. प्राप्तिकर कायद्याच्या १० (10-डी) नुसार, मिळविलेल्या विम्याची रक्कम अधिक विमा कंपनीकडून काही बोनस रक्कम मिळाली असल्यास ती रक्कम, पॉलिसीच्या मुदतपूर्ती वेळी किंवा मृत्यूनंतर मिळणारी सर्व रक्कम प्राप्तिकर सवलतीस पात्र असते. पण, याबाबत काही अटी व शर्ती आहेत. पण, ‘टर्म इन्शुरन्स पॉलिसी’ उतरविताना, ती कर वाचविण्याच्या उद्देशाने उतरू नये. प्राप्तिकर कमी भरावा लागावा म्हणून काहीजण शेवटच्या क्षणी म्हणजे मार्च महिन्यात कोणत्यातरी पॉलिसीत गुंतवणूक करतात, हे पूर्णत: चुकीचे आहे. यातून ‘मिससेलिंग’ होऊ शकते. विमा एजंट त्याला जास्त कमिशन मिळावे म्हणून नको ती ‘पॉलिसी’ घ्यायला तुम्हाला उद्युक्त करू शकतो. कर वाचविण्यासाठी ‘पॉलिसी’ घेतली, तर कमी वेळा गरजेपेक्षाही जास्त रकमेची उतरविली जाऊ शकते.

 

मृत्यूनंतरची रक्कम ‘नॉमिनी’च्या बँक खात्यात जमा केली जाते. ‘पॉलिसी’ चालू असतानाच्या काळात जर ‘पॉलिसी’धारकास मृत्यू आला, तर ‘पॉलिसी’ची रक्कम ‘नॉमिनी’लाच दिली जाते. ‘टर्म इन्शुरन्स पॉलिसी’मध्ये एक ‘रिटर्न ऑफ प्रीमियम्स प्लान’ (टीआरओपी) आहे. ‘पॉलिसी’धारक जर ‘पॉलिसी’चा संपूर्ण काळ जगला, तर मुदतपूर्ती फायदे मिळत नाहीत. फक्त जितका ‘प्रीमियम’ भरला तितकीच रक्कम परत मिळते. बरेच जण ही ‘पॉलिसी’ कमी कालावधीची उतरवितात, हे चूक आहे. ही ‘पॉलिसी’ जास्तीत जास्त कालावधीचीच उतरवावयास हवी. कमी कालावधीची उतरविली व ‘पॉलिसी’धारक जीवंत राहिला, तर त्याला ‘प्रीमियम’ भरलेली रक्कम परत मिळणार. अन्य काही फायदे मिळणार नाहीत. परिणामी, गुंतवणूकदाराची ही ‘डेड’ गुंतवणूक ठरू शकतेजर दीर्घ कालावधीसाठी उतरविली व त्या दरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास ‘नॉमिनी’ला विम्याची उतरविलेली पूर्ण रक्कम व अन्य फायदे मिळू शकतात. एखाद्याने कमी कालावधीसाठी ‘टर्म इन्शुरन्स’ घ्यावा लागेल व त्यावेळी जास्त ‘प्रीमियम’ भरावा लागेल.

‘भारतीय जीवन विमा महामंडळ’ (एलआयसी) व अन्य खासगी कंपन्या ‘टर्म इन्शुरन्स पॉलिसी’ विकतात. प्रत्येकाने त्याच्या त्याच्या गरजेनुसार त्या त्या कंपनीची ‘पॉलिसी’ घ्यावी. विम्याची गुंतवूणक म्हणून बिल्कूल विचार करू नये. गुंतवणुकीसाठी चांगला परतावा देणारे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. कोणत्याही विम्यावर जर तुम्ही मुदतपूर्तीपर्यंत जीवंत राहिलात, तर फक्त पाच ते सहा टक्के परतावा मिळतो. ‘जीवन विमा पॉलिसी’ घेऊन मुदतपूर्वीपर्यंत जे जीवंत राहतात, त्यांची विम्यातील गुंतवणूक ही व्यर्थ ठरते. जे ‘पॉलिसी’ काळात मृत्यू पावतात, त्यांचे कायदेशीर वारसच विम्याचे पूर्ण फायदे घेऊ शकतात. विमा गरजेपेक्षा कमी उतरवू नये आणि जास्तही उतरवू नये, योग्य तसा उतरवावा. कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देऊन उतरवावा. गुंतवणूक किंवा प्राप्तिकर सवलत यांसाठी विमा उतरविणे, हा योग्य पर्याय ठरत नाही.


 

आपली गरज ओळखून विमा निवडावा. त्यासाठी आयुर्विमा कंपन्यांकडून मुदत विमा आणि ‘अ‍ॅन्डॉव्हमेंट’ विमा योजना उपलब्ध आहेत. अनेक विमा योजना ठरावीक कालावधीनंतर खात्रीशीर परतावा देण्याचे आश्वासन देतात. यामुळे मनात संभ्रम निर्माण होतो की, विमा ही गुंतवणूक योजना आहे का? याचे उत्तर संबंधित विमा योजनेत दडलेले असते. ‘आयुर्विमा योजना’ संभाव्य धोक्यापासून निर्माण होणार्‍या आर्थिक नुकसानीपासून बचाव करण्याचे शस्त्र आहे. विमाधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास आर्थिक जबाबदार्‍या पूर्ण करण्यासाठी ‘आयुर्विम्या’चा दावा संमत होवू शकतो. देशातील विमा इच्छुक व्यक्तींची मानसिकता लक्षात घेऊन खात्रीशीर परतावा देणार्‍या विमा योजना तयार करण्यात आल्या. पण, बर्‍याचदा असे दिसून येते की, मोठ्या रकमेचा मुदतविमा कमी दरात उपलब्ध होतं असल्यामुळे ‘अ‍ॅन्डॉव्हमेंट’ विमा योजनेकडे दुर्लक्ष केले जाते. एकच विमा योजना सर्व प्रकारचे आर्थिक धोके आणि आर्थिक गरजा पूर्ण करू शकत नाही, म्हणूनच विमा योजना निवडताना विचारांची स्पष्टता अधिक महत्त्वाची आहे. आर्थिक सल्लागार निवडल्यास मुदतविमा आणि निधीत परतावा देणारा विमा या दोन्ही प्रकारच्या विमा योजनांची मागणी आहे.


 

आयुर्विमा निवडताना...

आर्थिक जबाबदार्‍या असणार्‍या व्यक्तींचा मुदत विमा असणे गरजेचे आहे. ठरविलेली मुदत विमा रक्कम आपल्या पश्चात कुटुंबाची आर्थिक गरज पूर्ण करणारी असावी म्हणजे, ‘अंडर-इन्शुरन्स’ असू नये. ‘अ‍ॅन्डॉव्हमेंट’ स्वरुपातील विमा किमान २०-२५ वर्षे कालावधीचा असावा. कारण, निश्चित परतावा देणार्‍या विमा योजना अंदाजे चार ते सहा टक्के दराने परतावा देतात. निश्चित परतावा देणार्‍या विम्याची रक्कम पाच वर्षे किंवा दहा वर्षे टप्प्याटप्प्याने घ्यावी. जेणेकरून पैशांचा स्रोत चालू राहतो. हाती आलेले एकरकमी पैसे पटकन खर्च होऊ शकतात.

@@AUTHORINFO_V1@@