देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'अटल युवा रोजगार केंद्र'चे उदघाटन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2021   
Total Views |

BJYM_1  H x W:  
 
 
 
मुंबई : मुंबई भारतीय जनता युवा मोर्चातर्फे सुरु करण्यात आलेल्या “अटल युवा रोजगार केंद्र”चे उदघाटन राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. नुकताच हा उदघाटन सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार मंगल प्रभात लोढा, आ.मिहीर कोटेचा, आ.आशिष शेलार, आ.पराग अलवाणी, मुंबई भाजारातीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्यासह मुंबई भाजयुमोचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
 
 
यावेळी मुंबई भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना म्हणाले की, "अटल युवा रोजगार अभियानांतर्गत मुंबईत रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांचा बायोडाटा संकलित करून ती सर्व माहिती आम्ही विविध कंपन्यांना पाठविणार आहोत. यासाठी मुंबई भाजयुमो RSHR टीम सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत काम करत आहे. सदरील कंपनीच्या माध्यमातून आम्हाला हिंदुस्तान टाइम्स, एअरटेल, एचडीएफसी लाईफ आणि फ्लिपकार्ट सारख्या 274 कंपन्यांची संसाधने उपलब्ध होणार आहेत. मुंबईतील गरजू युवक आणि नोकरी शोधणाऱ्यांसाठी मुंबई भाजयुमोतर्फे आभासी आणि प्रत्यक्ष असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. युवकांनी आपली माहिती दाखल करण्यासाठी https://mumbaibjym.org/jobapplication पोर्टलला अवश्य भेट द्यावी. तसेच मुंबईच्या विविध भागांमध्ये उभारलेल्या अटल युवा रोजगार बुथवर युवकांनी आपली माहिती दाखल करावी," असे आवाहन भाजयुमोचे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांनी केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@