मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Worli illegal dargah news) वरळीतील सासमीरा रोडवरील गुलिस्तान इमारतीच्या शेजारी असलेल्या सोसायटीच्या जागेवर बेकायदेशीररीत्या एका दर्ग्याचे अतिक्रमण करण्यात आले होते. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर आणि अतिक्रमणाच्या वाढत्या प्रयत्नांमुळे, वरळीतील भाजप कार्यकर्त्यांनी या बेकायदेशीर अतिक्रमणाचा निषेध करत ती जागा त्वरित मोकळी करून घेतली.