प्रतिबंधित इमारतीतील नागरिकांचे सुरक्षिततेसाठी स्थलांतर वाढले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jul-2020
Total Views |

mumbai sealed building_1&




मुंबई :
मुंबईत प्रतिबंधित क्षेत्रे आणि इमारतीमधील रहिवासी सुरक्षिततेसाठी सेकंड होम अथवा ग्रीन झोनमधील नातेवाईकांकडे स्थलांतरित होऊ लागले आहेत.झोपडपट्टीत कोरोना संसर्गित रुग्ण सापडला तर तेवढा भाग सील करण्यात येतो, तर इमारतीत रुग्ण सापडला तर तेवढा मजला प्रतिबंधित करण्यात येतो. सध्या हे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे संसर्ग होण्याच्या भीतीने लोक ग्रीन झोन मधील आपल्या नातेवाईकांकडे किंवा सेकंड होममध्ये राहण्यासाठी जात आहेत. अशा स्थलांतरितांचे प्रमाण वाढू लागले आहे.



कोरोनाचे रुग्ण आढळलेले परिसर सील केले जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. मुंबईत ७५० कंटेन्मेंट झोन असून ५८७५ इमारती सील केल्या आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएसआर) तत्वानुसार पालिका आयुक्तांनी नियमात काही बदल केले आहेत. त्यामुळे आता कोरोना रुग्ण आढळून येईल ते घर अथवा इमारतीचा भाग (मजला ) सीलबंद केला जातो. अशा सील झालेल्या इमारतीत राहणारे लोक कोरोनाच्या भीतीच्या छायेत जगत आहेत.




सील केलेल्या इमारती किंवा घरे यांच्या शेजारी राहणारे नागरिक कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीने आता आपल्या नातेवाईकांकडे किंवा आपल्या सेकंड होम मध्ये सुरक्षित राहण्यासाठी जाणे पसंत करीत आहेत. गेल्या पंधरा दिवसात कंटेन्मेंट झोनमधील बहुतांश नागरिकांनी स्थलांतर केले आहे. सेकंड होम नसलेले, तसेच नातेवाईक जवळ नसलेले नागरिक आहे त्याच ठिकाणी जीव मुठीत घेऊन दिवस ढकलीत आहेत. काही इमारतीत तीन ते चार कुटुंबे क्वारंटाईन आहेत. तेथील रहिवासी भयभीत आहेत. पालिकेची आरोग्य यंत्रणा वाढत्या कोरोनापुढे तोकडी पडत आहे. महिन्याभरातून एक-दोनदा औषध फवारणी केली जाते. तात्काळ तपासणी आणि उपचार होत नसल्याने रुग्ण वाढत असल्याचे बोलले जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@