दाभोळमध्ये कासवांच्या आठ नवजात पिल्लांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Mar-2020
Total Views |
turtle _1  H x
 
 

जाळीत अडकून पिल्लांचा मृत्यू

 
मुंबई (प्रतिनिधी) - दापोली तालुक्यातील दाभोळच्या किनाऱ्यावर समुद्री कासव संवर्धनासाठी बांधलेल्या हॅचरीच्या जाळीमध्ये अडकून कासवांच्या आठ पिल्लांचा मृत्यू झाला आहे. ही पिल्लेआॅलिव्ह रिडले प्रजातीची आहेत. याप्रकरणी वन विभागाने या किनाऱ्यावर कासव संवर्धनाचे काम करणाऱ्या कासवमित्राची चौकशी केली असून लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.
 
 
 
 
 
कोकण किनारपट्टीवर सध्या सागरी कासवांचा विणीचा हंगाम सुरू आहे. आॅलिव्ह रिडले प्रजातीच्या माद्या किनाऱ्यांवर अंडी घालण्यासाठी येत आहेत. दाभोळच्या किनाऱ्यावर मादी कासवाने अंडी घातली आहेत. या किनाऱ्यावर सागरी कासव संवर्धन मोहिमेअंतर्गत कासवांच्या अंड्यांच्या संवर्धनाचे काम केले जाते. यासाठी किनाऱ्यावर हॅचरी बांधून त्यामध्ये अंडी ठेवली जातात. भरतीच्या पाण्याचा आणि शिकारी प्राण्यांचा या अंड्यांना धोका असल्याने ही दक्षता घेतली जाते. मात्र, मंगळवारी दाभोळ किनाऱ्यावरील हॅचरीमधील घरट्यामधून बाहेर पडलेली आठ पिल्ले दगावल्याची घटना घडली. हॅचरीच्या जाळीत अडकून या पिल्लांचा मृत्यू झाला.
 
 
 
 
 
 
घरट्यामधून बाहेर पडल्यानंतर पिल्ले समुद्राच्या दिशेने निघाल्यावर ती जाळीत अडकली गेली. यावेळी कासवमित्र त्याठिकाणी उपस्थित नसल्याची त्यांची सुटका झाली नाही. परिणामी उन्हाने आणि मुंग्या लागून त्यांचा मृत्यू झाला. साधारण ५० दिवसांच्या अंडी उबवणीच्या काळानंतर घरट्यांवर खोलगट खड्डा पडण्यास सुरुवात होते. पिल्ले घरट्याबाहेर पडण्याचा हा संकेत असतो. परंतु, या प्रकरणामध्ये संबंधित कासवमित्राने सांगितल्याप्रमाणे घरट्याला खोलगट खड्डा पडला नसल्याने त्याने योग्य ती काळजी घेतली नसल्याचे दापोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव बोराटे यांनी सांगितले. त्यामुळे हा प्रकार घडला असून वरिष्ठांशी बोलून या कासवमित्राला बदलण्याबाबत आणि त्याच्या सोबतीला दुसरा व्यक्ती देण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@