पुरोगामी महाराष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Feb-2020
Total Views |

bhau torsekar_1 &nbs



 ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर ७० दिवसही उलटत नाही तोच पुरोगामी महाराष्ट्रात अभिव्यक्ती व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचा खळबळजनक प्रकार शनिवारी उघडकीस आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मालेगाव प्रकरणातील सहभागाबाबत भाष्य केल्याच्या रागातून ज्येष्ठ पत्रकार आणि ‘दै. मुंबई तरुण भारत’चे माजी संपादक भाऊ तोरसेकर यांच्याविरोधात पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करत शरद पवार यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा आरोप केला आहे. मात्र ही तक्रार म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा प्रकार असल्याचा आरोप होत आहे. आपल्याविरोधात बोलणार्‍या पत्रकारांवर दबाव आणण्याचा हा प्रयत्न असून त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका सर्व स्तरांतून केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खांबिया यांनी शिवाजी नगर पोलिसांत याप्रकरणी शनिवारी तक्रार दाखल केली. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर व अन्य समाज माध्यमांमधून शरद पवार यांच्या हत्येची ते चिथावणी देत असल्याचा नाहक आरोप या तक्रारीतून करण्यात आला आहे. आपल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, मागील काही महिन्यांपासून समाज माध्यमांवर टोकाच्या विद्वेशाची भावना पसरवणे, तसेच जातीय तणाव निर्माण करून महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय ऐक्याला तडा जातील, अशा अनेक पोस्ट सोशल मीडियावर आपण पाहत आहे. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचे राजकारण थांबल्यानंतर हा प्रकार कमी होईल, असे वाटत होते. त्यामुळे याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर पत्रकार भाऊ तोरसेकर आणि इतरांकडून सातत्याने युट्यूब, पोस्टमन पोर्टल आदी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमधील भाषणे पाहिली तर तरुणांमध्ये व समाजात शरद पवार यांना संपवले पाहिजे, बॉम्ब व गोळ्यांचा वापर केला पाहिजे, अशी चिथावणीखोर वक्तव्ये केल्याचे निदर्शनास आले आहे, ”असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

भाऊ तोरसेकर हे सोशल मीडियावर लिखाण आणि व्हिडिओतून विचार मांडत असतात. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही एक पुस्तक लिहीले आहे. तोरसेकर यांच्या लिखाणावरही अनेकदा सोशल मीडियावर चर्चा झडत असतात. मात्र आता त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार करून दडपण आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.



ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर हे शरद पवार यांच्या मालेगावमधील केसबाबत खुलेपणाने परखड भाष्य करतात. या रागातूनच त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करून दडपण आणण्याचा हा प्रयत्न आहे. आत्तापर्यंत एकाही केसमध्ये त्यांचे नाव नाही. मात्र सरकार आणि पोलिसांनी हे प्रकरण जर वाढवण्याचा प्रयत्न केला तर ‘लीगल राईट्स ऑर्ब्झव्हेटरी’ आणि देशभरातील अन्य १२ ‘लीगल अक्टिव्हिट्स फोरम्’ हे भाऊ तोरसेकर यांच्यामागे कायदेशीर संरक्षणासाठी उभे राहतील.
- विनय जोशी, निमंत्रक, ‘लीगल राईट्स ऑर्ब्झव्हेटरी’ (एलआरओ)
@@AUTHORINFO_V1@@